Rohit Pawar : शंभू महादेवाला साकडे घालत तुळापूरपासून रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेला सुरुवात

एमपीसी न्यूज – युवा वर्गाच्या विविध प्रश्नांसाठी कर्जत जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित  पवार यांनी युवा संघर्ष यात्रा सुरू केली ( Rohit Pawar) आहे. यात्रेची सुरुवात छत्रपती संभाजी महाराजांचे समाधी स्थळ असलेल्या श्री क्षेत्र तुळापूर येथून करण्यात आली. आज पहाटे साडेपाच वाजता संगमेश्वराच्या महादेवाला अभिषेक घालून साकडे घालून रोहित पवार यांनी या यात्रेला सुरुवात केली. यावेळी आमदार अशोक पवार, रोहित पाटील, देवदत्त निकम यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

Alandi : आळंदी येथून जलदिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान

ही यात्रा तुळापूर मार्गे फुलगाववरून वढू बंधाऱ्यावरून पुढे आली. दरम्यान पदयात्रेच्या मार्गावरील सैनिकी शाळेतील शंभर मुलांनी रोहित पवार यांचे चित्र काढून रोहित पवार यांच्या युवा यात्रेला युवा संघर्षा यात्रेला पाठिंबा दिला. या मुलांनी काढलेल्या चित्राने रोहित पवारही भारावले.

दरम्यान युवा संघर्ष यात्रेचा हा शिरूर हवेली तालुक्यातील पहिला प्रवासाचा टप्पा आहे. आज यात्रेचा पहिला दिवस होता. दररोज 17 ते 22 किलोमीटर अंतर ही पदयात्रा कापणार आहे. 45 दिवस ही पदयात्रा असून, ही यात्रा नागपूर येथे विधिमंडळाच्या ( Rohit Pawar)  अधिवेशनादरम्यान पोहोचणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.