Pimpri : ‘आरपीआय’ चिंचवड आणि भोसरीतील भाजपच्या उमेदवारांचा प्रचार करणार – सुरेश निकाळजे

एमपीसी न्यूज – विधानसभा निवडणुकीमध्ये चिंचवडचे भाजप उमेदवार लक्ष्मण जगताप आणि भोसरीचे महेश लांडगे यांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गट जोमाने प्रचार करणार आहे. दोन्ही मतदार संघातील उमेदवारांना भरघोस मताने निवडून आणणार असल्याचे आरपीआयचे शहराध्यक्ष सुरेश निकाळजे यांनी सांगितले.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात निकाळजे यांनी म्हटले आहे की, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय नेते रामदास आठवले आज केंद्रात सलग दोनदा मंत्रीपद भूषवत आहेत. महाराष्ट्र विधानसभेच्या सहा जागा आरपीआयला सोडल्या आहेत. त्या जागा पूर्ण ताकदीने निवडून येण्यास महायुती मदत करणार आहे.

त्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी चिंचवडमधील आणि भोसरीतील भाजप उमेदवारांचा प्रचार करणार आहेत. त्यांना भरघोस मताने निवडून आणण्यासाठी ताकदीने दोन्ही मतदार संघात जोरदार प्रचार करणार आहोत. दोन्ही मतदारसंघातील चिंचवड व भोसरी उमेदवारांच्या उमेदवारी अर्ज भरताना रिपब्लिकन पक्षातील सर्व जेष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.