Samarth Bharat Abhiyan : समर्थ भारत अभियाना अंतर्गत मनाच्या श्लोकांची पन्नासावी प्रभात फेरी

एमपीसी न्यूज  मनाच्या श्लोकांची पन्नासावी प्रभात फेरी 15 नोव्हेंबर 2022  संपन्न होणार आहे. गेली साडेचार वर्षे सातत्याने यमुना नगर निगडी भागात दर महिन्याच्या पंधरा तारखेला मनाच्या श्लोकांचे गायन अव्याहत सुरू आहे. या प्रभात फेरीचा उद्देश असा आहे की (Samarth Bharat Abhiyan) आपण ज्या भागांमध्ये राहतो त्या भागात सुविचार पेरले जाणे त्या सुविचाराचा अनुरूप समाजामध्ये सूक्ष्म बदल होणे हे अपेक्षित आहे.

अश्विन 23 शक संवत 1940 अश्विन शुक्ल षष्ठी, सोमवार अर्थात 15 ऑक्टोबर 2018 रोजी पहिली फेरी संपन्न झाली. पहिल्या फेरी पासून सुजाण नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला, पाठिंबा दिला आणि तो अजूनही आहे. वास्तविक अशा प्रकारचा उपक्रम मोरया गोसावी स्थित चिंचवड गावात श्री जयंतराव कुलकर्णी गेले एक दशक पार पाडत आहेत. ते देखील प्रेरणास्थान आहेत. या प्रभात फेरीचा उद्देश असा आहे की आपण ज्या भागांमध्ये राहतो त्या भागात सुविचार पेरले जाणे त्या सुविचाराचा अनुरूप समाजामध्ये सूक्ष्म बदल होणे हे अपेक्षित आहे. एखाद्या परिसरातील सूक्ष्म बदल देखील विशाल कार्य करून दाखवतात. हे सगळं बळ श्री समर्थ रामदास स्वामी रचित मनोबोध वा मनाचे श्लोक यातून प्राप्त होते .

Family doctor : फॅमिली डॉक्टर संकल्पना अधिकाधिक वृद्धिंगत व्हावी. : डॉ. सुरेश अडवाणी

 

205 मनाच्या श्लोकांपैकी आम्ही दर प्रभात फेरीला या 35 श्लोकांचे सामूहिक गायन करत निगडी येथील पावन मारुती मंदिरापासून ते मॉडर्न शाळा मार्गे ठाकरे उद्यान किर्लोस्कर कॉलनी मार्गे पुन्हा पावन मारुती मंदिर अशी फेरी संपन्न करीत असतो. या श्लोकांच्या गायनाने रोजच्या धकाधकीच्या कामात तारतम्य, सहिष्णुता, समोरच्या व्यक्तीचा आदर बाळगून, सचोटीने पण चांगल्या सोबत चांगले आणि अविचारांसोबत योग्य विचारांनी लढायचं वागायचं तारतम्य देतात.

प्रभू रामचंद्र हे कार्य आपल्याकडून करून घेतात असा ठाम विश्वास जसा समर्थांना होता तसेच आम्हा सर्व समर्थ भारत अभियानात काम करणाऱ्या पाईकाला वाटतो तसा विश्वास आहे. हे कार्य समर्थ आमच्याकडून करून घेत आहेत. गेल्या साडेचार वर्षात काही काळ करोनाचा खडतर काळ होता परंतु या काळात देखील समर्थांनी योग्य मार्गदर्शन केले या काळात ही प्रभात फेरी ऑनलाइन पद्धतीने चालू राहिली. (Samarth Bharat Abhiyan) या ऑनलाइन माध्यमाचा फायदा आम्हा सर्वांना झाला कारण या माध्यमामुळेच आम्हाला सज्जनगडावरून योगेश बुवा रामदासी, तसेच चिन्मय मिशनचे स्वामी तेजोमयानंद जी, त्याचप्रमाणे आदरणीय श्री गोविंद देवगिरी महाराज, राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे बुवा, कॉर्पोरेट कीर्तनकार लिमये, महामंडलेश्वर अभिषेक चैतन्य गिरी त्याचप्रमाणे वेद चैतन्य जी यांचे मार्गदर्शन लाभले. समाजमनावर आणि स्वतःच्या मनावर काम करणारे हे मनाचे श्लोक त्याच्या अर्थातील बारकावे आम्हाला सांगितले त्याचबरोबर रोजच्या दिवसभराच्या कामात नामस्मरण आणि त्यासोबत सचोटीने वागण्या बोलण्याचे संस्कार केले.

येणारी पन्नासावी प्रभात फेरी दिनांक 15 नोव्हेंबर 2022 रोजी आहे आणि योगायोग ह्याच दिवशी बिरसा मुंडा जयंती आहे ज्यांनी स्वातंत्र्यपूर्वकाळात स्वातंत्र्याचा मोठा लढा उभा केला होता. एकूणच सध्याची समाजाची मानसिक स्थिती बघता त्याला बल देणारे मनोधैर्य वाढवणारे आणि विचारांना योग्य दिशा देणारे असे मनाचे श्लोक ही समाजाची आणि प्रत्येक माणसाची खरी गरज आहे. (Samarth Bharat Abhiyan) वातावरणातील प्रदूषणापेक्षा वैचारिक प्रदूषण याच्या वरचा उतारा म्हणजेच मनाचे श्लोक. तरी यानिमित्ताने आपणा सर्वांना हे आवाहन करण्यात येत आहे की आपणही या उपक्रमात सहभागी व्हावे आणि सकारात्मक ऊर्जेचा अनुभव घ्यावा किंवा अशा प्रकारचा उपक्रम आपण आपल्या परिसरात सुरू करावा. ही प्रभात फेरी यमुना नगर निगडी येथील पावन मारुती मंदिर येथून सकाळी सहा वाजता सुरू होणार असून सकाळी सात वाजता समाप्त होणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.