Sangavi Crime News : दुर्दैवी घटना ! भटक्या श्वानावर धारदार शस्त्राने वार, डोळे निकामी

एमपीसी न्यूज – भटक्या श्वानावर अज्ञात इसमाने धारदार शस्त्राने वार केल्याची धक्कादायक घटना सांगवीत उघडकीस आली आहे. या हल्ल्यात श्वान गंभीर जखमी झाले असून त्याचे डोळे निकामी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गुरुवारी (दि.27) हा प्रकार उघडकीस आला.

याप्रकरणी अक्षय म्हसे (रा. जुनी सांगवी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सांगवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, भटक्या श्वानावर अज्ञात इसमाने धारदार शस्त्राने वार केल्याची माहिती प्राणीमित्र अक्षय म्हसे यांना मिळाली. त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन तात्काळ श्वानाला रुग्णालयात दाखल केले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

हल्यात श्वान गंभीर जखमी झाले आहे तसेच डोक्यावर मार लागल्याने त्याचे डोळे निकामी झाले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.