Sangvi Suicide: व्यावसायिकाच्या आत्महत्येप्रकरणी चौघांना अटक

एमपीसी न्यूज : नवी सांगवी येथे एका व्यावसायिकाने ऑफीसमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सांगवी पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या आहेत.(Sangvi Suicide) ही घटना 2 जुलेे रोजी नवी सांगवी येथे घडली आहे.

 

मारूती गणपतराव तरटे (वय 50 रा. नवी ,सांगवी) असे मयताचे नाव असून याप्रकरणी अशोक मच्छिंद्र जानराव (वय 61 रा. सांगवी), कुणाल अशोक जानराव (वय 34 रा. नवी सांगवी) व दोन महिला आरोपी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.

 

Women abuse: महिलेशी गैरवर्तन करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरटे यांनी 2 जुलेे रोजीच त्यांच्या नवी सांगवी येथील ऑफीसमध्ये पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनास्थळावरून तीन पानाची सुसाईडनोट सापडली. ज्यामध्ये आरोपींनी मयत मारूती यांना मानसिक त्रास दिल्याने मी जीवनयात्रा संपवत आहे. (Sangvi Suicide) जानराव कुटुंबियांनी माझी बदनामी केली असून माझ्या मृत्यूला तेच जबाबदार असतील असे सांगितले होते. यावरून पोलिसांनी पंचनामा केला मात्र घरच्यांनी याविषयी कोणतीही तक्रार देण्यास नकार दिला. शवविच्छेदना नंतर पोलिसांनी शनिवारी (दि.6) स्वतः गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.