Sangvi Crime News : एक लाखाच्या कर्जासाठी तरुणीला 35 लाख 86 हजारांचा गंडा

एमपीसी न्यूज – एक लाखांचे कर्ज देण्याच्या बहाण्याने एका फायनान्स कंपनीतून बोलत असल्याचे सांगून अज्ञातांनी तरुणीला 35 लाख 86 हजारांचा गंडा घातला. हा प्रकार 6 फेब्रुवारी ते 23 जून 2021 या कालावधीत नवी सांगवी येथे घडला.

श्रद्धा सुधाकर भोळे (वय 24, रा. नवी सांगवी) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार वनिता (मोबाइल 9643846152), अगरवाल (मोबाइल 8376899545), नीलम (मोबाइल 8826495230, 9754297329) आणि इतर (मोबाइल 8791843697, 8791423798) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणीला नवीन व्यवसाय सुरू करायचा असल्याने तिला एक लाख रुपये कर्जाची आवश्‍यकता होती. दरम्यानच्या काळात आरोपींनी तिला फोन करून आपण आदित्य बिर्ला फायनान्स कंपनीतून बोलत असल्याचे सांगितले. तिला आयएमपीएस चार्जेस, सर्व्हिस चार्जेस, फंड मॅनेजमेंट चार्जेस, इन्कम टॅक्स चार्जेस, डीडी चार्जेस अशी वेगवेगळी कारणे सांगून तिला 35 लाख 86 हजार रुपये 21 बँकेतील वेगवेगळ्या खात्यात ऑनलाईन भरण्यास भाग पाडले. तसेच दिलेले पैसे रिफंड करणार असल्याचे सांगून तिची फसवणूक केली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.