Sangvi : गणेश विसर्जन मिरवणूक; सांगवी मधील सात मार्ग वाहतुकीसाठी बंद

एमपीसी न्यूज – सांगवी परिसरातील गणेश विसर्जन सातव्या (Sangvi) दिवशी होते. बहुतांश घरगुती गणपती देखील सातव्या दिवशी विसर्जित केले जातात. सोमवारी (दि. 25) सातवा दिवस असून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून विसर्जन मिरवणूक काढली जाते. या मिरवणुकीमुळे वाहतूक कोंडी होते. त्यामुळे मिरवणूक मार्गावरील वाहतूक वळवण्यात आली आहे. सात मार्गांवरील वाहतूक सोमवारी दुपारी चार ते रात्री बारा वाजेपर्यंत वळवण्यात आली आहे.

PCMC : नोकर भरती ! प्रशासनाच्या ‘या’ चुकीचा परीक्षार्थींना मनस्ताप, पालिकेत होताहेत हेलपाटे

बंद मार्ग – कृष्णा चौकाकडून फेमस चौकाकडे जाणारा मार्ग बंद
पर्यायी मार्ग – पाण्याची टाकी जुनी सांगवी मार्गे सांगवी महात्मा फुले ब्रिजमार्गे.

बंद मार्ग – माहेश्वरी चौकाकडून माकण हॉस्पिटल चौक जुनी सांगवीकडे जाणारा मार्ग
पर्यायी मार्ग – बँक ऑफ महाराष्ट्र जुनी सांगवी मार्गे औंध किंवा पाण्याची टाकी जुनी सांगवी मार्गे सांगवी महात्मा फुले ब्रिज मार्गे.

बंद मार्ग – कृष्णा चौकाकडून साई चौक ते माहेश्वरी चौकाकडे जाण्यास बंदी.
पर्यायी मार्ग – काटेपूरम चौकातून डावीकडे वळून मयूरनगरी-एमके हॉटेल उजवीकडे वळून ढोरे फार्म-बा रा घोलप-महात्मा फुले ब्रिज मार्गे.

बंद मार्ग – कृष्णा चौकाकडून क्रांती चौक/फेमस चौकाकडे जाणारा मार्ग बंदी.
पर्यायी मार्ग – काटे पूरम चौकातून डावीकडे वळून मयूरनगरी-एमके हॉटेल उजवीकडे वळून ढोरे फार्म-बा रा घोलप-महात्मा फुले ब्रिज मार्गे.

Pune : अखिल मंडई मंडळ, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ नियोजित वेळेतच सायंकाळी  विसर्जन मिरवणुकीत होणार सहभागी

बंद मार्ग – कृष्णा चौकाकडून साई चौकाकडे जाणारा मार्ग बंदी.
पर्यायी मार्ग – काटेपूरम चौकातून डावीकडे वळून मयूरनगरी-एमके हॉटेल उजवीकडे वळून ढोरे फार्म-बा रा घोलप-महात्मा फुले ब्रिज मार्गे.

बंद मार्ग – साई चौक तसेच कृष्णा चौकाकडून जुनी सांगवी पाण्याच्या टाकीकडे जाण्यास बंदी.
पर्यायी मार्ग – बा रा घोलप-ढोरे फार्म-एमके हॉटेल-मयूरनगरी-काटे पूरम चौक मार्गे.

बंद मार्ग – पाण्याची टाकी जुनी सांगवी ते बँक ऑफ महाराष्ट्र चौक तसेच शितोळे पेट्रोल पंपाकडे जाण्यास बंदी.
पर्यायी मार्ग – साई चौकातून पाण्याची टाकी जुनी सांगवी पोलीस चौकीजवळून महात्मा फुले ब्रिज कडून (Sangvi) औंध मार्गे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.