Sangvi :सांगवी येथे सातव्या दिवशी गणरायाचे मोठ्या उत्साहात विसर्जन

एमपीसी न्यूज – ढोलताशा पथकं, ज्येष्ठांचे भजनी मंडळ, टाळ (Sangvi) मृदंग, घंटानाद, पारंपरिक वस्त्र, भगवे ध्वज, डीजेवर थिरकणारी तरुणाई, लाखोंचा जनसागर आणि “पुढच्या वर्षी लवकर या” चा जयघोष, असे आकर्षक चित्र काल सांगवी येथे गणेश विसर्जन सोहोळ्यात पाहायला मिळाले.

परंपरेनुसार सातव्या दिवशी सांगवीतील गणरायाचं विसर्जन मोठ्या जल्लोषात व भक्तिमय वातावरणात करण्यात आले. ढोल ताशांच्या वादनाने परिसर दुमदुमला होता.

तर डीजेच्या तालावर लहान मुलं, तरुण तरुणी यांच्यासह ज्येष्ठांनीही ठेका धरला होता. मिरवणुकीच्या रथाच्या रांगाचरांगा लागल्या होत्या. मिरवणुकीच्या रथावर साकारण्यात आलेले आकर्षक देखावे सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.

ढोलताशा पथकांचे शिस्तबद्ध व उत्साही वादनशैली पाहण्यासाठी (Sangvi) लोकानी गर्दी केली होती

ठिकठिकाणी मिरवणुकीमुळे वाहतुक मार्गात बदल करण्यात आला होता. पोलीस आणि पालिकेचे अधिकारी कर्मचारी ठिकठिकाणी तैनात करण्यात आले होते.

विसर्जन घाटावर आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कार्यरत होती. तर ठिकठिकाणी मूर्ती संकलन मोठ्या प्रमाणात होत होते.

Pune : टोमॅटो शेतकऱ्यांच्या व्यथा! महिनाभरापूर्वी 200 रुपयांना विकला जाणारा आता 5 रुपयालाही कोणी विचारत नाही

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.