Sangvi : विनयभंग प्रकरणी एकास अटक

एमपीसी न्यूज – महिलेच्या विनयभंग प्रकरणी (Sangvi) पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली. महिलेने ब्लॉक करून देखील तिचा चोरून पाठलाग करत सोशल मीडियावर अश्लील मेसेज करत तिचा विनयभंग केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. ही घटना मे 2019 ते 4 एप्रिल 2023 या कालावधीत पिंपळे निलख येथे घडली.

सागर रावसाहेब तोडमल (वय 33, रा. खराडी, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

PCMC : महापालिकेच्या अग्निशामक विभागास NOC तून 245 कोटींचे उत्पन्न  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेची इच्छा नसताना आरोपीने तिचा चोरून पाठलाग केला. फिर्यादीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. फिर्यादीने मोबाईलवर ब्लॉक करून देखील टेक्स्ट अश्लील मेसेज करून व फोन करून त्रास दिला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.