PCMC : महापालिकेच्या अग्निशामक विभागास NOC तून 245 कोटींचे उत्पन्न  

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशामक विभागाला (PCMC) ना-हरकत दाखला (एनओसी) आणि  इतर शुल्कांद्वारे 245 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

अग्निशामक विभागाच्या वतीने शहरातील इमारती, व्यवसाय, उद्योग धंद्यांना ना हरकत दाखला दिला जातो. तसेच एखाद्या कार्यक्रम स्थळी आगीची घटना घडल्यास अग्निशामक दलाची गाडी त्वरीत उपलब्ध व्हावी, यासाठी कार्यक्रमस्थळी स्टॅन्ड बाय अग्निशामक दलाची गाडी ठेवणे बंधनकारक असते. यासाठी महापालिका 5 हजार रूपये शुल्क घेत असते.

 

Bhosari : आमदार लांडगे यांच्या परिवर्तन हेल्पलाईनवर 30 लाखांच्या खंडणीचा मेसेज

ना हरकत दाखला देणे, सशुल्क स्टॅन्ड बाय अग्निशामक दलाची गाडी देणे आणि एखाद्या ठिकाणी पाणी फवारणे यातून अग्निशामक विभागाला उत्पन्न मिळत असते.(PCMC) याचबरोबर शहर परिसरातील चारही बाजूने झपाट्याने बांधकाम प्रकल्प होत आहेत. बांधकाम परवानगीसाठी अर्ज करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांना संबंधित गृहप्रकल्पासाठी अग्निशामक विभागाची एनओसी घेणे बंधनकारक आहे. त्यासाठी आवश्‍यक शुल्क अग्निशामक विभागाकडे जमा करावे लागते.

अग्निशामक विभागाला 2018-19 मध्ये 75 कोटी, 2019-20 मध्ये 65 कोटी तर 2020-21 मध्ये 53 कोटी, 2021-22 मध्ये 205 कोटी तर 2022-23 या आर्थिक वर्षांत तब्बल 245 कोटी रूपयांचे उत्पन्न मिळाले असल्याचे अग्निशामक विभागाचे सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात यांनी सांगितले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.