Sangvi : भरधाव स्विफ्ट कारची रिक्षाला धडक; एकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – भरधाव वेगात आलेल्या स्विफ्ट कारने रिक्षाला धडक दिली. या अपघातात रिक्षामध्ये बसलेल्या एका प्रवाशाचा मृत्यू झाला. तर एक प्रवासी गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी (दि. 16) पहाटे जुनी सांगवी येथे घडली.

अंगद विनायक तरंगे (वय 31, रा. मारुंजे) यांनी याप्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार स्विफ्ट कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे अंगद त्यांच्या रिक्षांमधून प्रवासी भाडे घेऊन जात होते. ते सांगवी फाट्याजवळील ब्रिजजवळ आले असता भरधाव वेगात आलेल्या एका स्विफ्ट कारने (एमएच 04 / सीटी 1309) त्यांच्या रिक्षाला धडक दिली.

या अपघातात रिक्षामध्ये बसलेल्या एका प्रवाशाचा मृत्यू झाला. तर दुसरा गंभीर जखमी झाला. अपघाताची खबर न देता कारचालक पळून गेला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.