Sangvi : दुकानात चोरी करताना अल्पवयीन मुलाला रंगेहाथ पकडले

एमपीसी न्यूज – लोखंडी काटावणीने दुकानाचे शटर उचकटत असताना एका अल्पयीन मुलाला सांगवी पोलिसांनी रंगेहाथ पकडले. ही घटना रविवारी (दि. 9) पहाटे चारच्या सुमारास पिंपळे सौदागर येथील लकी सुपर मार्केट येथे घडली.

करण सखाराम चौधरी (वय 19, रा. पिंपळे सौदागर) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

  • याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करण यांचे पिंपळे सौदागरमधील पाम ब्रिज सोसायटीमध्ये लकी सुपर मार्केट नावाचे किरणा मालाचे दुकान आहे. रविवारी पहाटे चारच्या सुमारास एक 17 वर्षीय मुलगा दुकानाचे शटर लोखंडी कटावणीच्या साहाय्याने उचकटून दुकानात चोरी करण्याची तयारी करीत होता.

शटर उचकटत असताना त्याला ताब्यात घेतले. दुकानाचे मालक करण यांनी याप्रकरणी फिर्याद दिली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.