Nigdi : सॅनिशूटर ! निगडीतील विद्यार्थी अभियंत्याने बनवले मनगटी सॅनिटायझर

Sanishooter! A wrist sanitizer made by an engineering student in Nigdi : मनगटावर घालता येणारे हे उपकरण दिसायला आकर्षक व वजनाने हलके आहे

एमपीसी न्यूज – निगडी-प्राधिकरण येथील विद्यार्थी अभियंता आदित्य आसबे याने ‘सॅनिशूटर’ हे मनगटी सॅनिटायझर बनवले आहे. मनगटावर घालता येणारे हे उपकरण दिसायला आकर्षक व वजनाने हलके आहे.

कोरोना या जीवघेण्या आजारापासून बचाव करण्यासाठी सध्यातरी कोणतेही रामबाण औषध सापडलेले नाही. या विषाणूपासून बचावासाठी मास्क, सॅनिटायझर आणि फिजीकल डिस्टन्सिंग हेच एकमेव पर्याय आहेत.

अशात हात वारंवार स्वच्छ करण्याच्या सूचना तज्ञ देत असतात. यावर उपाय काढत निगडी-प्राधिकरण येथील तरुण अभियंता आदित्य आसबे याने मनगटी सॅनिटायझर बनवले आहे.

‘सॅनिशूटर’ असे या उपकरणाचे नाव आहे. हे दिसायला आकर्षक, वजनाला अतिशय हलके आहे. रिस्ट बॅण्डच्या स्वरूपात मनगटाला बांधता येईल किंवा मनगटी घड्याळाला सहज जोडता येईल असे हे उपकरण आहे.

त्यामध्ये पंचवीस मिलीलिटर एवढे सॅनिटायझर भरले की त्यातून तीनशे वेळा सॅनिटायझरचे सिंचन करता येते. सरासरी पाच दिवस हे द्रावण पुरते आणि संपले की पुन्हा भरता येते.

_MPC_DIR_MPU_II

पर्यावरणाचा विचार करून सॅनिशूटर हे कमीतकमी प्लास्टिकचा वापर करून बनविण्यात आले आहे.

आदित्य आसबे हा चेन्नई येथील वेल्लोर इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॅाजी या अभियांत्रीकी महाविद्यालयात मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या  शेवटच्या वर्षात शिक्षण घेत आहे.

या उपकरणाबाबत माहिती देताना आदित्य म्हणाला, साधारण दोन आठव़ड्यात हे उपकरण बाजारात उपलब्ध होईल. सर्वांना परवडेल अशी 100 रूपये याची प्रारंभीची किंमत ठेवण्यात आली आहे.

संकेतस्थळाच्या माध्यमातून ‘सॅनिशूटर’ हे मनगटी उपकरण मागवता येणार आहे. या उपकरणासाठी ओंकार मुळजे या मित्राने आदित्य आसबे याला सहकार्य केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.