Scuba Diver : स्कुबा डायवर बाप-लेकीने केला विश्वविक्रम

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड मधील सर्वात लहान व पहिली स्कुबा डायवर (Scuba Diver) ओवी विनय सातपुते हिने जगातील सर्वोत खोल असलेला दुबई येथील डीपडाईव दुबई पुलमध्ये 12 जून रोजी यशस्वी डाईव केली. अशी डाईव करणारे ते भारतातील पहिले बाप-लेक ठरल्याचे ग्लोबल रेकाॅर्ड्स ॲन्ड रिसर्च फाऊंडेशनने GLOBAL RECORDS AND RESEARCH FOUNDATION (GRRF) जाहीर केले. त्यासाठी ओवी व तिचे बाबा विनय यांना सन्मानपत्र व स्मृतीचिन्ह देऊन सन्मानीत करण्यात आले.

जगातील सर्वात खोल असलेला हा जलतरण तलाव तब्बल 60 मीटर – 200 फूट खोल आहे. सहा ऑलिम्पिकचे पुल भरतील इतका हा भव्य तलाव जगाचे भुषण ठरत आहे. ओवी बरोबर तिचे वडील विनय सातपुते यांनी देखील यशस्वी डाईव केली. ते दोघेही 18 मीटर खोल 60 फूटपर्यंत खाली गेले हेते. या आधी या बाप-लेकीच्या जोडीने दोन भारतीय विक्रम केले आहेत. ते दोघे भारतातील पहिले एकत्र स्कुबा डायवींग लायसन्स धारक आहेत. तेव्हा ओवी अवघ्या 12 वर्षांची होती. तसेच अॅडवेंचर स्पोर्ट्समधे ‘WE CAN IF U WIL’ या पुस्तकाचे ते भारतातील पहिले लेखक-लेखिका आहेत. India Book of records कडूनही त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

Panchamada Songs : पिंपरी-चिंचवडकरांसाठी मोठी पर्वणी; चिंचवडमध्ये शनिवारी रंगणार ‘पंचमदा’ गीतांचा कार्यक्रम

कोरोनामुळे मागील दोन वर्ष कुठेच स्कुबा डायवींग करता आले नाही असे ओवीने सांगितले. 2022 मध्ये काहीतरी भव्य करण्याच्या उद्देशाने मी माझ्या बाबांबरोबर ही डाईव करण्याचे ठरविले व आम्ही यशस्वी झालो. परदेशासारख्या डाईवींगच्या सुविधा भारतात सुद्धा व्हाव्यात यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे विनय सातपुते यांनी सांगितले. दुबईतील या भव्य तलावामध्ये डाईव करणारे सुद्धा आम्ही पहिलेच बाप-लेक आहोत. स्कुबा डाईवींग या साहसी खेळाचे अनेक फायदे आहेत. जैव विविधता संशोधन व समुद्रामधील खनीज संपत्ती शोधण्यासाठी स्कुबा डाईवर्स लागतात. भारताला अतिशय नयनरम्य असा 7517 किलोमीटरचा समुद्र किनारा आहे. परंतु, डायवींगला लागणार्या सर्व सोयींचा (Scuba Diver) अभाव आहे. या सोयी झाल्या तर जगभरातील लोकं डायवींगसाठी भारतात येतील असे ओवीने सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.