Patas Toll Plaza : मुख्यमंत्र्यांचा आदेश असतानाही वारकऱ्यांकडून घेतला टोल

एमपीसी न्यूज : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूरला (Patas Toll Plaza) आषाढी सोहळ्यासाठी जाणाऱ्यांकडून टोल घेऊ नये असे आदेश काही दिवसांपूर्वी दिले होते. असे असतानाही वारकऱ्यांकडून नियमबाह्य टोल वसूल केल्याप्रकरणी पाटस येथील चार कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यवत पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाटस टोलनाक्याचे अधिकारी अजय सिंग ठाकूर, सुनील थोरात, विकास दिवेकर, आणि बालाजी वाघमोडे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत.

Pimpri News: गॅस दरवाढीच्या विरोधात काँग्रेसचे आंदोलन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र शासनाच्या वतीने पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांकडून टोल वसूल करू नये असे जाहीर केले होते. यासोबतच यवत पोलीस स्टेशनचे अधिकारी नारायण पवार यांनी देखील टोलनाका प्रशासनाला शासनाच्या या आदेशाविषयी कळविले होते. तरी देखील शुक्रवारी पाटस टोलनाक्यावर वारकऱ्यांच्या वाहनांकडून टोल वसूल केला जात होता. काही ठिकाणी तर टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांनी वारकऱ्यांसोबत हुज्जत घालून टोल वसूल केला.

दरम्यान, या प्रकरणाची एक चित्रफित व्हायरल झाली आहे. काही वारकरी हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना टोलमाफी केली आहे असे सांगताना दिसत आहे. तर टोलनाक्यावरील कर्मचारी मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख करून टोल माफी विषयी आम्हाला कळविण्यात आले नाही, असे सांगताना दिसत आहेत. यावेळी नाईलाज झाल्याने वारकऱ्यांना त्या ठिकाणी टोल द्यावा लागला. दरम्यान पाटस टोलनाक्यावरील या घटनेची माहिती सर्वत्र पसरल्यानंतर यवत पोलिसांनी टोलनाका (Patas Toll Plaza) प्रशासनाच्या चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.