Senior citizen gathering: निरोगी ज्येष्ठत्व ही अमृतमहोत्सवाची भेट – डॉ. सागर कवडे

एमपीसी न्यूज : ज्येष्ठ नागरिकांचा उत्साह आणि उर्जा ही तरुणांना लाजवणारी असते. (Senior citizen gathering) असे आरोग्य संपन्न ज्येष्ठत्व हीच खरी अमृत महोत्सवाची भेट आहे, असे मत सहाय्यक पोलीस उपायुक्त डॉ. सागर कवडे यांनी व्यक्त केले.

पिंपरी-चिंचवड ज्येष्ठ नागरिक महासंघ, लोकमान्य हॉस्पीटल आणि नेरियॅट्रीक वेलनेस फाऊंडेशन संघांच्या वतीने भारताच्या अमृत मोहोत्सवी वर्षा निमीत्त ज्येष्ठ नागरिकांच्या आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.या मेळाव्याचे उद्घाटन डॉ. सागर कवडे यांनी केले. यावेळी ते बोलत होते.याप्रसंगी लोकमान्य हॉस्पीटलचे सिईओ मोहन नायर, सि ओ.ओ. अशोक जेन, ज्येष्ठ नागरिक महासंघाचे अध्यक्ष बागडे, कार्याध्यक्ष वैशाली मरळ यावेळी उपस्थित होते.

Mangalagaur : किवळे येथे मंगळागौर उत्साहात साजरी

यावेळी ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याविषयी जनजागृतीसाठी लोकमान्य आरोग्य संवाद या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.(Senior citizen gathering) ज्येष्ठ अस्थिरोग तज्ञ डॉ. आशिष सुर्यवंशी, डॉ. भूषण गणवारे, फूट अन्ड अँकल  स्पेशालिस्ट डॉ. शाम ठक्कर, मूत्रविकार तज्ञ डॉ.सुनिल पालवे, कॅन्सर तज्ञ डॉ. पंकज क्षिरसागर आणि ह्रदयरोग तज्ञ डॉ. मंगेश कुलकर्णी यांनी ज्येष्ठांशी संवाद साधला. त्यांच्या शंकाचे निरसन यावेळी करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नागरिकांच्या स्पर्धाही घेण्यात आल्या व विजेत्यांना बक्षिस वितरण करण्यात आले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.