Dapodi : जातीवाचक शिवीगाळ करत मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी सात जणांवर गुन्हा

Seven charged for verbal fight and death threat in Bhosari.

एमपीसी न्यूज – जातीवाचक शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या सात जणांवर भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (दि. 30) पहाटे जयभिमनगर, दापोडी येथे घडली.

बबलू बबन सोनवणे (वय 35), मोनिका सोनवणे, सोनू बबन सोनवणे, दावित त्रिंबक बळीद, अमित रमेश बळीद, राॅकी रमेश बळीद, अशोक बळीद (सर्व रा. गेनू कांबळे चाळ, जयभिमनगर, दापोडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याप्रकरणी संतोष दत्तात्रय कांबळे (वय 40, रा. गेणू कामळे चाळ, जयभिमनगर, दापोडी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास आरोपींनी आपसात संगणमत करून फिर्यादी यांच्या घरासमोर बेकायदेशीर जमाव जमावला.

त्यानंतर फिर्यादी यांच्या घरावर तलवार आणि काठ्यांनी मारले आणि फिर्यादी यांना जातीवाचक शिवीगाळ केली. त्यानंतर आरोपींनी फिर्यादी यांना जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like