Pimpri: पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त महापालिकेच्या वतीने अभिवादन

pcmc remembrance on punyashlok ahilyabai holkar jayanti

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या महापालिका मुख्य प्रशासकीय इमारतीतील प्रतिमेस महापौर उषा ढोरे यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

तसेच पिंपरी येथील मोरवाडी येथे असणाऱ्या त्यांच्या पुतळ्यास महापौर उषा ढोरे यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी उपमहापौर तुषार हिंगे, सत्ताधारी पक्षाचे पक्षनेते नामदेव दाके, नगरसेविका आशा शेंडगे, माजी नगरसेवक राजू दुर्गे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, उप अभियंता विजय भोजने, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक हे उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.