Pune : शामसुंदर भोसेकर यांचे निधन

एमपीसी न्यूज – आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शामसुंदर हरिभाऊ भोसेकर (वय 83) यांचे अल्पशा आजाराने गुरुवारी रात्री खाजगी रुग्णालयात निधन झाले.

पुण्यातील सीडीओ कार्यालयातून वरिष्ठ लेखापाल पदावरून ते निवृत्त झाले होते. येरवडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर हौसिंग सोसायटी तसेच सांस्कृतिक भवन ट्रस्टचे ते माजी सचिव होते. आंबेडकरी चळवळीतील विविध उपक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सूना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

पुणे महापालिकेचे उपायुक्त जयंत भोसेकर यांचे ते वडील होत. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी दुपारी येरवडा येथील विद्युतदाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शहर अभियंता प्रशांत वाघमारे, आमदार जयदेव गायकवाड, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते एम. बी. वाघमारे, माजी उपमहापौर नगरसेवक डॉ. सिद्धार्थ धेंडे, शिवसेना गटनेते पृथ्वीराज सुतार, संजय भोसले, नगरसेविका शितल सावंत, अॅड. वैशाली चांदणे, विवेक चव्हाण, सह महापालिका आयुक्त अंबरिश गालिंदे, ज्ञानेश्वर मोळक यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

यावेळी विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर तसेच पुणे महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांची श्रद्धांजली अभिवादन सभा रविवारी दि. 9 फेब्रुवारीला सांय. पाच वाजता डॉ. आंबेडकर सोसायटी सांस्कृतिक भवन येरवडा येथे आयोजित करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.