Sharad Pawar : ‘महिला कुस्तीपटूवर लैंगिक अत्याचार प्रकरणी केंद्र सरकारने गांभीर्याने नोंद घ्यावी’

एमपीसी न्यूज : भारतीय कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांनी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्याचा निर्णय घेतल्यानंतर वाद निर्माण झाला होता. त्याच दरम्यान महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद विशेष कार्यकारिणी आणि विशेष सर्व साधारण सभेचं आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील वारजे येथे करण्यात आले होते. या सभेला राज्यभरातील 45 संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

Odisha Accident : त्या अपघातावेळी लाल बहादूर शास्त्री यांनी दिला होता राजीनामा; शरद पवारांनी केली घटनेची आठवण

तसेच बृजभूषण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूनी लैंगिक अत्याचाराचाही आरोप केला. यावर ज्येष्ठ नेते शरद पवार यांना विचारले असता, त्यांनी प्रतिक्रिया दिली, की दिल्ली येथील महिला कुस्तीपटूवर लैंगिक अत्याचार झाल्याची तक्रार आहे. त्याबाबत केंद्र सरकारने गांभीर्याने नोंद घ्यावी. तसेच त्या प्रकरणी दिल्ली सरकारने लक्ष घालून त्या मुलींना न्याय मिळवून द्यावा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.