Shirur : मी पंधरा वर्षे काय केले, हे विचारण्यापेक्षा तुम्ही काय केल?

खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा विरोधकांना संतप्त सवाल

एमपीसी न्यूज – दहा-पंधरा वर्षे गायब असलेली मंडळी मला प्रश्न विचारत आहेत, की मी गेली पंधरा वर्ष काय केले ? मी काय केले हे जनतेला ठाऊकच आहे. पण तुम्ही काय केलत ? असा संतप्त सवाल खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी कवठे येथे झालेल्या कोपरा सभेत केला आहे.

शिरुर लोकसभा मतदार संघाचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी कवठे गावाला भेट दिली. त्यावेळी ग्रामस्थांनी जल्लोषात मिरवणूक काढून स्वागत केले. संपूर्ण गावातून पदयात्रा काढून खासदारांनी गावक-यांशी संवाद साधला. या भेटीदरम्यान घेण्यात आलेल्या कोपरा सभेला ते बोलत होते. यावेळी जयश्री पलांडे, अरुण गिरे तसेच शिवसेना भाजपा महायुतीचे पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.

  • आढळराव पुढे म्हणाले, “खासदारकीच्या माध्यमातून मतदारसंघाच्या भरीव विकासासाठी गाव तिथे निधी दिला आहे. मतदारसंघातील रस्त्यांच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर केला. आतापर्यंत कोणता खासदार प्रत्येक गावागावांत पोहोचला होता ?” असे विचारीत तुम्ही केलेल्या कामांचा हिशोब द्या असे म्हणत विरोधकांवर जोरदार तोफ डागली.

गावभेटी दरम्यान विविध प्रकारच्या प्रलंबित प्रश्नांवर चर्चा केली. नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या, छोटे-मोठे व्यापारी, शेतकरी, फळविक्रेते तसेच बाजारासाठी आलेल्या आसपासच्या गावातील ग्रामस्थांशी खासदारांनी संवाद साधला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.