Nigdi News : सोहम सार्वजनिक ग्रंथालय व अभ्यासिका येथे शिवजयंती साजरी

एमपीसी न्यूज- चारित्र्यवान आणि कुशल अधिकारी (Nigdi News) घडविणारी सोहम सार्वजनिक ग्रंथालय व अभ्यासिका येथे लोककल्याणकारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.    

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली याप्रसंगी नगरसेविका सुजाताई पलांडे व सामाजिक कार्यकर्ते नंदू कदम हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. नंदू कदम यांनीही स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. याप्रसंगी मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक व स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी उपस्थित होते.

Talegaon Dabhade : छत्रपती शिवाजी महाराज हे तीनच शब्द हिंदुस्थानला अखंड ठेवतील – रामदास काकडे

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जगन्नाथ नेरकर यांनी प्रास्ताविक करताना म्हणाले की, घटकांच्या कल्याणाचा विचार करणारा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अद्वितीय व्यक्तिमत्त्वातून बुद्धिमत्ता व्यूहरचना साहस मानवतावादी दृष्टिकोन आदी अनेक गुण आजच्या तरुण पिढीला घेण्यासारखे आहे.

तरुणांनी गड किल्ल्यांना भेटी देऊन तेथील स्थापत्य जाणून घ्यावे मा. सुजाता यांनी आपले विचार व्यक्त केले तरुण पिढीने महाराजांची बुद्धिमत्ता व्यूहरचना साहस द्रष्टेपणा आणि (Nigdi News) संपूर्ण रयतेच्या हिताची काळजी यासारखे गुण मात्र आजही पूर्वी इतकेच मोलाचे आणि आवश्यक आहेत आजच्या तरुणांनी महाराजांच्या चरित्रातून अशा प्रकारच्या प्रेरणा घ्यावी असे मत त्यांनी व्यक्त केले.

मनोज सोनवणे यांनी आभार मानले ग्रंथपाल वर्षा बोरसे यांनी कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन केले

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.