Talegaon Dabhade : छत्रपती शिवाजी महाराज हे तीनच शब्द हिंदुस्थानला अखंड ठेवतील – रामदास काकडे

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. (Talegaon Dabhade) यावेळी संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. छत्रपती शिवाजी महाराज हे तीन शब्द हिंदुस्थानला अखंड ठेवू शकतील असे प्रतिपादन रामदास काकडे यांनी केले.

पारंपारिक वेशभूषा केलेले असंख्य विद्यार्थी,महाराष्ट्र धर्माचे प्रतीक असलेले असंख्य भगवे झेंडे, शिवरायांच्या पराक्रमाची गीते, जय शिवराय या गगनभेदी घोषणां आणि छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी अशा आगळ्यावेगळ्या पारंपरिक पध्दतीने इंद्रायणी महाविद्यालयात शिवजयंती सोहोळा पार पडला.

महाराजांच्या मिरवणूकीने कार्यक्रमाची सुरुवात झाली.प्रसंगी इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे अध्यक्ष  रामदास आप्पा काकडे, कार्यवाह चंद्रकांत शेटे, विश्वस्त संजय साने, परेश पारेख, (Talegaon Dabhade) इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संभाजी मलघे,बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. संजय आरोटे, डी.फार्मसीचे प्राचार्य डॉ जी एस शिंदे, उपप्राचार्य,प्राध्यापक,शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

Vadgaon Maval : शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी दिनेश ढोरे

याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे बोलताना म्हणाले की,परकीय शत्रूला सेवेला ठेवून भारतात सर्व प्रथम आरमाराची निर्मिती करणारे छत्रपती शिवराय, इंडियन नेव्हीचे जनक आहेत. शत्रू बलाढ्य असेल तर तडजोड करणे,शत्रू बेसावध असेल तर हल्ला करणे अशा अनेक युद्ध तंत्राला आत्मसात करून स्वराजाचा पाया रचणारे ” छत्रपती शिवाजी महाराज ” हे तीन शब्दच हिंदुस्थानला अखंड ठेवू शकतात असे प्रतिपादन काकडे यांनी केले.

राष्ट्रप्रेमाची भावना, स्त्रियांबद्दल आदरभाव आणि पराक्रम या त्रिसूत्रीची देणगी छत्रपतींनी आपल्या कर्तृत्त्वातून स्वराज्याच्या रयतेला दिली  असे काकडे यांनी सांगितले.

यावेळी शिवव्याख्याते विवेक येवले, दीपक पवार यांची शिवव्याख्यानावर स्फूर्तिदायी भाषणे झाली.याप्रसंगी महाविद्यालयातील वाणिज्य शाखेतील विद्यार्थींनींनी ‘ झुलवा पाळणा ‘ या कार्यक्रमावर सांस्कृतिक प्रात्यक्षिक सादर केले.

कार्यक्रमाचे नियोजन वाणिज्य विभागाच्या प्रमुख रूपकमल भोसले आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संभाजी मलघे तसेच प्रज्वल शेडगे व पवन गायकवाड या विद्यार्थ्यांच्या (Talegaon Dabhade) नेतृत्वाखाली तृतीय वर्ष वाणिज्य विभागाच्या विद्यार्थ्यांनी केले. सूत्रसंचालन धनश्री बधाले यांनी केले तर स्वागत आणि आभार प्रज्वल शेडगे यांनी मानले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.