Vadgaon Maval : शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी दिनेश ढोरे

एमपीसी न्यूज – वडगाव मावळ येथील राजा शिवछत्रपती जयंती उत्सव समिती सन 2023 च्या अध्यक्षपदी वडगाव नगरपंचायतचे गटनेते दिनेश ढोरे यांची निवड करण्यात आली. (Vadgaon Maval) शिवजयंती उत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष भास्करराव म्हाळसकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मावळते अध्यक्ष शेखर वहिले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली.

यावेळी झालेल्या बैठकीस वडगाव शहर शिवजयंती उत्सव समितीचे संस्थापक भास्करराव म्हाळसकर, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर,नारायण ढोरे,अनिस तांबोळी,वडगांव शहर भाजपा अध्यक्ष अनंता कुडे,आतिष ढोरे,नगरसेवक किरण म्हाळसकर, मा.नगरसेवक ॲड.विजय जाधव,प्रसाद पिंगळे, रवींद्र काकडे,भूषण मुथा,शंकर भोंडवे,किरण भिलारे,सरस्वती व्याख्यानमालेचे अध्यक्ष पत्रकार सुदेश गिरमे,दिलीप चव्हाण,अरुण वाघमारे,ॲड.अजित वहिले,योगेश व.म्हाळसकर,विनायक भेगडे, योगेश म्हाळसकर, कुलदीप ढोरे,ज्ञानेश्वर म्हाळसकर,मकरंद बवरे, संतोष भालेराव, अतुल चव्हाण, दीपक शास्त्री आदी उपस्थित होते.

Dehu road : देहुरोड येथे सोन्याच्या दुकानातून ग्राहकाने चोरले चार लाखांचे दागिने

उत्सवाचे यंदा 44 वे वर्ष आहे. ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिरामध्ये झालेल्या बैठकीत दिनेश ढोरे यांची सर्वानुमते यावर्षीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली, (Vadgaon Maval) त्यानंतर उत्सव समितीची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

मंगळवार दि.7 ते शुक्रवार दि.10 मार्च 2023 या 4 दिवसांदरम्यान विविध स्पर्धा व कार्यक्रमांचे आयोजन, पुरस्कार वितरण सोहळा, मिरवणूक असे नियोजन करून शिवजयंती उत्सव भव्य स्वरूपात साजरा करण्यात येणार आहे.

 

शिवजयंती उत्सव समिती कार्यकारिणी – सन 2023 पुढीलप्रमाणे-

अध्यक्ष-   दिनेश ढोरे

कार्याध्यक्ष – रवींद्र म्हाळसकर ( नगरसेवक)

कार्यक्रमप्रमुख – सोमनाथ ढोरे, श्रीधर चव्हाण (मा.नगरसेवक )

उपाध्यक्ष- शरद मोरे, दीपक कुडे, प्रशांत चव्हाण,सागर भिलारे

सरचिटणीस – कल्पेश भोंडवे

खजिनदार – अतुल म्हाळसकर

सह चिटणीस – दीपक भालेराव , हरीश दानवे,ओंकार शिंदे ,

सहखजिनदार – अमोल ठोंबरे, गणेश हिंगे.

नूतन कार्यकारिणीला संस्थापक अध्यक्ष भास्करराव म्हाळसकर यांनी शुभेच्छा दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.