Dehu road : देहुरोड येथे सोन्याच्या दुकानातून ग्राहकाने चोरले चार लाखांचे दागिने

एमपीसी न्यूज – ज्वेलर्सच्या दुकानात ग्राहक म्हणून आलेल्या एका व्यक्तीने दुकानदाराची नजर चूकवून हातचलाखीने चार लाखांचे दागिने चोरले.(Dehu road)ही चोरी 7 फेब्रुवारी रोजी दुपारी देहूरोड मेन बाजारात कांचन ज्वेलर्स या दुकानात घडली.

प्रदीप कुमार कांतीलाल पारेख (वय 54, रा. देहूरोड) यांनी याप्रकरणी शनिवारी (दि. 18) देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पारेख यांचे कांचन ज्वेलर्स हे दुकान देहूरोड मेन बाजारात आहे.

Charholi News : शिवजयंती निमीत्त सोसायटीमध्ये भरवले शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन

7 फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास एक अनोळखी व्यक्ती पारेख यांच्या दुकानात आला. त्याने साडेसात तोळे वजनाचे चार लाख रुपये किमतीचे कानातील दागिने दाखवण्यास सांगितले. पारेख यांनी दागिने दाखवले असता त्या व्यक्तीने पारेख यांची नजर चुकवून हातचलाखीने ते (Dehu gaon) दागिने घेऊन जात फसवणूक केली. यावरून देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, देहूरोड पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.