Charholi News : शिवजयंती निमीत्त सोसायटीमध्ये भरवले शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन

एमपीसी न्यूज –  शिवजयंती म्हणजे केवळ फोटो व पुतळ्याला हार घालून साजरी न करता शिवरायांचा इतिहास जनमानसात पहोचावा त्यांच्या शौर्याप्रमाणे त्यांच्या शस्त्रांची (Charholi News) माहितीही सर्व सामान्यांना मिळावी यासाठी चऱ्होली य़ेथील तनिष ऑर्चिड, फेज 2 या सोसायटी मध्ये आज (रविवारी) शिवकालीन शस्त्रांचे प्रर्शन भरविण्यात आले आहे.  

या प्रदर्शनाचे यंदाचे हे 4 थे वर्ष आहे. सोसायटी म्हणून असा आगळावेगळा उपक्रम राबविणारी चऱ्होली बुद्रुक येथील ही पहिलीच सोसायटी आहे. इतिहासाचे संवर्धन तसेच सोसायटीतील सद्यस्य विशेषतः लहानमुले यांना शिवकालीन विविध शस्त्रे याचे ज्ञान व्हावे हा या प्रदर्शनाचा हेतू आहे.

 

Pimpri News : एक मत चिंचवडच्या विकासाची परंपरा सुरू ठेवण्यासाठी द्या – तेजस्वी सूर्या यांचे आवाहन

या प्रदर्शनात शिवकालीन सरळ व वक्र पात्याची धोप मराठा, मोगल,  राजपूत , असामी ” धोप” तलवार व कर्नाटकी कत्ती, मराठा ,मोगल , सिरोही कट्यार,खंजीर, (Charholi News) जांबिया, जुने अडकित्ते,  पट्टा, विविध आकारातील तोफगोळे, विटा, माडू ही दुर्मिळ शस्त्रे, इंग्रजकालीन बंदूक विविध प्रकारचे भाले व कुऱ्हाडी ही शस्त्र आपण प्रदर्शनात ठेवण्यात आलेली आहेत.

कुऱ्हाडीचे विविध प्रकार
मराठ्यांचे तलवार आणि कट्यार

या प्रदर्शनासाठी किरण काळजे,अनिकेत काळजे, प्रशांत राणे, महेश करडे, न्यानेश्वर ढगे, सोमेश खेडकर व विशाल ढेबे यांनी हे ऐतिहासिक प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.