Lonavala : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे १८ खासदारासह कार्ला एकविरादेवी दर्शनाला

सपत्निक घेतले कुलस्वामिनीचे दर्शन 

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुकीत भरघोस यश संपादन केल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी आपल्या १८ खासदारासह कार्ला येथील कुलस्वामिनी आई एकविरादेवीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते. 

ठाकरे घराण्याची कुलस्वामिनी आई एकविरादेवी असल्याने लोकसभेच्या निवडणुकी पूर्वी देखील उद्धव ठाकरे सपत्निक देवीच्या दर्शनासाठी आले असताना भाजपा शिवसेनेचे जास्तीत जास्त खासदार निवडून येतील यासाठी साकडे घातले होते. महाराष्ट्रात भाजपा शिवसेना युतीने प्रचंड यश मिळवले व ४२ खासदार निवडून आले. यामध्ये शिवसेनेचे १८  खासदार निवडून आल्याने गेल्या निवडणुकी प्रमाणे यावर्षी देखील पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, स्मिता ठाकरे, आदित्य ठाकरे व  १८ खासदारांना एकविरादेवी दर्शनासाठी घेऊन येऊन आपला नवस पूर्ण केला.

यावेळी नव्यानेच शिवसेनेचे मंत्री झालेले अरविंद सावंत, खासदार श्रीरंग बारणे, श्रीकांत शिंदे, गजानन किर्तीकर, राजन विचारे, भावना गवळी, राहुल शेवाळे, विनायक राऊत, धैर्यशील माने, संजय मंडलीक, हेमंत गोडसे, कृपाल तुमाणे, प्रतापराव जाधव, सदाशिव लोखंडे, संजय जाधव, राजेंद्र गावित, ओमराजे निंबाळकर, हेमंत पाटील यांच्यासह एकविरा देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष अनंत तरे, पुणे जिल्हा प्रमुख गजानन चिंचवडे, तालुकाप्रमुख राजू खांडभोर, लोणावळ्याच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव, माजी पुणे जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे, तालुका संघटक शरद हुलावळे, सुरेश गायकवाड, अंकूश देशमुख, श्रीधर पुजारी यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.