Shivai Electric Bus : 75 वर्षात पदार्पण करताना एसटीने घेतले ‘शिवाई’चे रूप

पुणे येथे 'शिवाई' या पहिल्या विद्युत प्रणालीवरील बसचे लोकार्पण व विद्युत प्रभारक केंद्राचे उद्घाटन

एमपीसी न्यूज : 1 जून 1948 साली पुणे-अहमदनगर महामार्गावर (Shivai Electric Bus) पहिली एसटी बस धावली होती. आज याच आपल्या लाल परीने 75 व्या वर्षात पदार्पण केले आहे. हे पदार्पण करताना तिने काळानुसार स्वत:ला अपडेट केले आहे. 75 व्या वर्षात पदार्पण करताना आधुनिकतेची सांगड घालत एसटी महामंडळाने पहिली इलेक्ट्रीक शिवाई बस लोकांच्या सेवेत दाखल केली आहे. ही बस देखील पुणे-अहमदनगर दरम्यान धावणार आहे. 

महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेली लाल परी आज 75 वर्षांची झाली. सोबतच तिने इलेक्ट्रिक रूप धारण केले आहे. आज एसटी महामंडळाच्या स्थापना दिनाच्या दिवशी शिवाईचा लोकार्पण सोहळा पार पडला. ‘शिवाई’ ही पर्यावरणपूरक असल्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले.

 

राज्य परिवहन महामंडळाने आपल्या बससेवेत काळानुरूप बदल केले असून महामंडळाच्या बसच्या माध्यमातून सुरक्षित अणि गुणवत्तापूर्ण सेवा देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

स्वारगेट बसस्थानक (Shivai Electric Bus) येथे आयोजित महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ पुणे विभागाच्या ‘शिवाई’ या विद्युत बससेवेचा शुभारंभ आणि विद्युत प्रभारक केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला परिवहनमंत्री ॲड.अनिल परब, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने, परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, पुणे विभाग नियंत्रक रमाकांत गायकवाड आदी उपस्थित होते.

Akurdi News : महापालिका खाद्यपदार्थ केंद्र विकसित करणार, चिखलीत ईव्ही स्टेशन उभारणार

एसटीवरचा जनतेचा विश्वास संपादन करणे महत्वाचे आहे. प्रवाशांना सुरक्षितरित्या प्रवास करता यावा यासाठी व्यवस्था वाढविण्यात येत आहेत. प्रवाशांच्या गरजा ओळखून एसटीने काळानुरूप अनेक बदल केले. निमआराम, वातानुकुलित बस, अश्वमेध, शिवनेरी अशा बससेवा सुरू करण्यात आल्या. 2017 मध्ये शिवशाही बस महामंडळाच्या सेवेत समाविष्ट करण्यात आली आणि आता विद्युत घटावर चालणारी बससेवा सुरू होत असून हा महत्वपूर्ण प्रसंग असल्याचा उल्लेखही पवार यांनी केला.

शिवाई बसमध्ये (Shivai Electric Bus) वायफाय यंत्रणा देण्यात आली आहे. प्रवाशांच्या मनोरंजनासाठी याचा उपयोग होईल असे सांगून राज्य परिवहन महामंडळाच्या 74 वर्षाच्या वाटचालीत योगदान देणाऱ्या चालक, वाहक, अधिकारी, कर्मचारी यांना धन्यवाद दिले. प्रवाशांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या भल्यासाठी शासन सर्वांच्या बरोबर आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.