Akurdi News : महापालिका खाद्यपदार्थ केंद्र विकसित करणार, चिखलीत ईव्ही स्टेशन उभारणार

एमपीसी न्यूज – आकुर्डी रेल्वे स्टेशन जवळील जागेत पिंपरी-चिंचवड महापालिका खाद्यपदार्थ केंद्र विकसित करणार आहे. त्याकामी येणा-या अंदाजे 6 कोटी रुपये खर्च येणार आहे. प्रभाग क्रमांक 3 च-होलीमधील अॅमेनिटी स्पेसमध्ये इलेक्ट्रिक पीएमपीएमएल बसेस चार्जिंगसाठी ईव्ही स्टेशन उभारण्यात येणार आहे. त्याच्या आवश्यक कामांसाठी येणा-या सुमारे 13 कोटी 40 लाख रुपयांच्या खर्चास प्रशासक राजेश पाटील यांनी मान्यता दिली.

महापलिका सभेची मान्यता आवश्यक असलेल्या विविध विषयांना मंजुरी देण्यासाठी प्रशासक पाटील यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीस विषयाशी संबंधित अधिकारी आणि विभागप्रमुख उपस्थित होते.

शहरातील अनधिकृत नळजोडणी नियमित करण्यासाठीच्या तसेच मनपाच्या नळजोडास अनधिकृतपणे जोडलेले विद्युत मोटार/ पंप जप्त करण्याच्या धोरणास, निवासी व वाणिज्य वापरातील अनधिकृत नळजोडणी नियमित करण्यासाठी आवश्यक अनामत रक्कम, दंडाची रक्कम, अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक याबाबतचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. तसेच महापालिकेच्या नळजोडास अनधिकृतपणे जोडलेले विद्युत मोटार पंप जप्त करून परत दिले जाणार नाहीत.

प्रभाग क्रमांक 3 च-होलीमधील अॅमेनिटी स्पेसमध्ये इलेक्ट्रिक पीएमपीएमएल बसेस चार्जिंगसाठी ईव्ही स्टेशन उभारण्यात येणार आहे. त्याच्या आवश्यक कामांसाठी येणा-या सुमारे 13 कोटी 40 लाख रुपयांच्या खर्चास मान्यता दिली. महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त तथा क्षेत्रीय अधिका-यांच्या प्रशासकीय व वित्तीय अधिकारांमध्ये वाढ करण्यात आली. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखेच्या कार्यालयासाठी साहित्यिक उपक्रमासाठी करारनामा करून जागा देण्यास प्रशासक राजेश पाटील यांनी बैठकीमध्ये मान्यता दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.