RTI Activist:दुर्घटना घडल्यास ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा- नाईक

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीतील विविध भागातील कच्चे रस्ते, डांबरी रस्त्यावरील खड्डे दुरुस्त करणे, मुरुम खडीने भरणे आणि डांबरी पॅचवर्क करण्याचे काम नगरपरिषदेने एच.सी. कटारीया या ठेकेदाराला दिले. ठेकेदाराने कामाला विलंब केल्यास दिवसाला केवळ 100 रुपये दंड आकारला जातो. त्यात वाढ करावी. दुरुस्त केलेल्या रस्त्यावर दुर्घटना घडल्यास ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते (RTI Activist) प्रदीप नाईक यांनी केली.

माहिती अधिकार कार्यकर्ते (RTI Activist) प्रदीप नाईक यांनी तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीतील रस्ते दुरुस्तीच्या कामासाठी एकूण ठेकेदार किती आहेत. त्यांच्या नावांची यादी मागवली होती. त्यावर नगरपरिषेद प्रशासनाने एच.सी.कटारिया ठेकेदाराला दिलेल्या कामाच्या आदेशाची प्रत नाईक यांनी दिली आहे. नगरपरिषद हद्दीतील विविध भागातील कच्चे रस्ते, डांबरी रस्त्यावरील खड्डे दुरुस्त करणे, मुरुम खडीने भरणे आणि डांबरी पॅचवर्क करण्याचे काम नगरपरिषदेने एच.सी. कटारीया यांना 11 फेब्रुवारी 2020 मध्ये दिले होते. काम मुदतीत न केल्यास प्रति दिवस केवळ 100 रुपये दंड आकारला जाईल, असे कार्यारंभ आदेशात म्हटले आहे.

त्यावर बोलताना प्रदीप नाईक म्हणाले, ”कामाला विलंब झाला. तर, दिवसाला केवळ 100 रुपये दंड आकारला जात आहे. दंडाची रक्कम अतिशय कमी आहे. त्यात वाढ करावी. प्रशासनाकडे एकाच ठेकेदाराची निविदा आली का, निविदेत स्पर्धा झाली नाही का, रस्त्ता दुरुस्तीचे काम व्यवस्थित होत नाही. प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष आहे. प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे लोकांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे प्रशासनाने काम देताना कडक धोरण राबवावे. एकदा रस्ता दुरुस्त केल्यानंतर काही कालावधीतच रोड खराब झाला. त्यावरुन काही दुर्घटना घडली. तर, ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे”.

Maharashtra Board Result 2022 : जूनच्या ‘या’ आठवड्यात लागणार दहावी-बारावीचे निकाल

”निविदा प्रक्रियेत स्पर्धा होऊन द्यावी. निविदेला चांगली प्रसिद्धी द्यावी. अनेकांनी निविदा प्रक्रियेत सहभाग घ्यावा. त्यादृष्टीने अटी-शर्ती टाकाव्यात. नागरिकांच्या माहितीसाठी ठेकेदाराची सविस्तर माहिती उपलब्ध करुन द्यावी. जेणेकरुन दुर्घटना घडल्यास नागरिकांना ठेकेदारांविरोधात कारवाई करता येईल”, असेही नाईक म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.