Shivdurg Series : शिवदुर्ग भाग 20 – शिवरायांच्या दूरदृष्टीचा साक्षीदार जलदुर्ग खांदेरी

एमपीसी न्यूज – छत्रपती शिवाजी महाराजांनी सह्याद्री व समुद्र यांच्या हातात हात घालून स्वराज्याची निर्मिती केली. जमिनीवरच्या शत्रूंवर वचक बसविलाच, पण सिद्दी, पोर्तुगीज, इंग्रज अशा समुद्रावरच्या शत्रूंवरही जरब बसवली. याकामी मदत झाली ती नेटके आरमार व मोक्याच्या ठिकाणी असलेले जलदुर्ग!

काही ठिकाणी मोक्याच्या जागा हेरून किल्ल्यांची निर्मिती शिवरायांनी केली. जसा सिंधुदुर्ग तसाच खांदेरी. खांदेरीचे भौगोलिक स्थान व त्याची दुर्गबांधणी यातून शिवरायांच्या दूरदृष्टीचे आश्चर्य वाटल्यावाचून राहत नाही.
संस्कारभारती, पुणे महानगर, सादर करीत आहे शिवदुर्ग मालिकेत ‘किल्ले खांदेरी’!

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.