Shivsena : माजी नगरसेविका मीनल यादव यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा संपन्न

एमपीसी न्यूज : शिवसेना माजी नगरसेविका (Shivsena) मीनलताई विशाल यादव यांच्या वाढदिवसानिमित्त दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा शनिवार दि. 2 जुलै रोजी शनिवार सायंकाळी 6 वाजता जिजामाता सांस्कृतिक भवन मोहननगर येथे संपन्न झाला.

कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूजन, पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. परिसरातील दोनशे विद्यार्थ्यांना शाल श्रीफळ, फाइल फोल्डर व पेन देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात परिसरातील ज्येष्ठ शिक्षिका डॉ. विजयश्री मेहता, कांतिलाल खिंवसरा शाळेची प्राध्यापक राविद्र शिंदे सर, सामाजिक कार्यकर्त्या सुमनताई नामदे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुभाष पागळे, आनंदनगर शिवसेना विभागप्रमुख संदीप कुऱ्हाडे, ज्येष्ठ शिवसैनिक के. एम रेड्डी, शाखाप्रमुख विनोद धोत्रे, शिवसेना मोहननगर उपविभागप्रमुख सोमनाथ अलंकार, शाखाप्रमुख नागेश नामदे, युवासेना संघटक रोहन (बाबू) नामदे, दिपक संमिदर या मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला.

यावेळी ज्येष्ठ शिक्षिका मेहता मॅडम त्यांच्या मनोगतात ”माणूस हा आयुष्यभर विद्यार्थी असतो. त्याची परीक्षा कधी संपत नाही. 48 व्या वर्षीसुद्धा तो शिक्षण घेत आहे व विविध पदांच्या परीक्षा देत आहे.” त्यानंतर सुभाष पागळे, शिंदे सर, सुमनताई नामदे यांचे अतिशय मोलाचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना झाले. या वेळेस अनेक विद्यार्थ्यांनी पुढील आयुष्यात (Shivsena) आपण काय काय करणार? याबद्दल आपल्या भूमिका मांडल्या.

Maval : परसबाग तयार करण्यासाठी महिलांना मोफत भाजीपाला बियाणे वाटप

तसेच, अनेक पालकांनी या कौतुक सोहळा आयोजन केल्याबद्दल मिनल यादव यांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अक्षय मोरे यांनी केले .
कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना शाखा मोहननगर, अष्टविनायक मित्र मंडळ व शिवसेना संघटक विशाल यादव यांनी केले व आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.