Dighi : दुकानाचे शटर उचकटून रोकड चोरीला

एमपीसी न्यूज – दुकानाचे शटर उचकटून दोन चोरट्यांनी रोख रक्कम चोरून नेली. ही घटना शुक्रवारी (दि. 28) रात्री दहा ते शनिवारी (दि. 29) पहाटे चार वाजताच्या सुमारास चऱ्होली बुद्रुक येथे घडली.

Chikhali : उघड्या दरवाजावाटे 52 हजारांचा ऐवज चोरीला

ओमकार नामदेव जाधव (वय 24, रा. शाहूनगर, चिंचवड), गणेश नामदेव श्रीगोंड (रा. चिखली) अशी गुन्हा दाखल झालेल्या चोरट्यांची नावे आहेत. याप्रकरणी दुकान मालक महिलेने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे चऱ्होली बुद्रुक येथे केक शॉप आहे. त्यांनी त्यांच्या दुकानात एक कामगार ठेवला आहे. कामगाराने शुक्रवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास बंद केले. रात्रीच्या वेळी चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून दुकानातून 1200 रुपये रोख रक्कम चोरून नेली. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

https://youtu.be/xgaIfHWQgaA

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.