Chikhali : उघड्या दरवाजावाटे 52 हजारांचा ऐवज चोरीला

एमपीसी न्यूज – घराच्या उघड्या दरवाजावाटे घरात प्रवेश करून चोरट्यांनी 52 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना शनिवारी (दि. 29) सकाळी साडेसात ते साडेआठ या कालावधीत सानेचौक, मोरेवस्ती, (चिखली) Chikhaliयेथे घडली.

Chikhali : नणंदेने वाहिनीला मारहाण करत घेतला चावा

परमेश्वर इरप्पा हेळवे (वय 26, रा. सानेचौक मोरेवस्ती, चिखली) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या घराचा दरवाजा अर्धवट उघडा असताना अज्ञात चोरट्याने उघड्या दरवाजावाटे घरात प्रवेश केला. घरातून 200 रुपये किमतीची बॅट, 30 हजार रुपये किमतीचा लॅपटॉप, 15 हजारांचा एक मोबाईल फोन आणि सात हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.