Dapodi : दुकानाचे लॉक तोडून 87 हजार रुपये लंपास

एमपीसी न्यूज – दापोडी येथील दुकानाचे लॉक तोडून 87 हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. ही घटना बुधवार (दि. 24) रात्री दहा ते गुरुवार (दि. 25) सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान घडली.

अब्दुल कादर खान (वय 54, रा. बॉम्बे कॉलनी, दापोडी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दापोडी येथे साई बाबा मंदिराजवळ खान यांचे दुकान आहे. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या दुकानाचे लॉक तोडून दुकानात प्रवेश केला. दुकानातील कपाटामध्ये ठेवलेली 87 हजार रुपयांची रोख रक्कम चोरटयांनी चोरून नेली. सकाळी खान दुकानात आले असता ही बाब त्यांच्या निदर्शनास आली. यावरून त्यांनी तात्काळ भोसरी पोलिसात गुन्हा नोंदवला. पोलीस उपनिरीक्षक प्रमोद काठोरे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.