Chikhali : जुगार अड्ड्यावर छापा; सात जणांना अटक

एमपीसी न्यूज – चिखली पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा मारला असून या कारवाईत सात जणांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 24) चिखली येथे करण्यात आली.

पोलिस शिपाई कबीर चौदसाहेब पिंजारी यांनी याप्रकरणी फिर्याद दिली. त्यानुसार सतीश दयाराम गाडवे (वय 27, रा. मोरेवस्ती, चिखली), तुकाराम पांडुरंग मुंगसे (वय 50, रा. नेवाळेवस्ती, चिखली), दत्तात्राय कारभारी कोरडे (वय 46, रा. मोरेवस्ती, चिखली), जयराम मानसिंग चव्हाण (वय 61, भीमशक्ती, चिखली), विलास महादेव फटांगरे (वय 47, रा. सुदर्शननगर,चिखली), सोमनाथ भिवाजी जाधव (वय 45, रा. चिखली), मंगेश रामदास स्वामी (वय 22, रा. मेरेवस्ती, चिखली) यांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिखली सुदर्शन नगर मधील एका गल्लीमध्ये जुगारअड्डा सुरु असल्याची माहिती चिखली पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून सुदर्शन नगर येथे सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा मारला. त्यावेळी सातजण जुगार खेळत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी सातजणांना अटक करून त्यांच्याकडून 4 हजार 870 रुपये किमतीचा जुगाराचा ऐवज जप्त केला आहे. आरोपींवर मुंबई जुगार कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.