Pune : स्वारगेट चौकात दुचाकी चालकावर गोळीबार, एक जण गंभीर जखमी

एमपीसी न्यूज : पुणे (Pune) शहरातील स्वारगेट चौकात दुचाकीवरून जाणार्‍या व्यक्तीवर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमध्ये आरोपी गंभीर जखमी झाला असून या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

Importance of Adhikamasa : अधिक मासाचे महत्व  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वारगेट येथील गणेश कला क्रिडा रंगमंच परिसरातून दुचाकीवरून दोघे जण जात होते.तर त्यांच्या बाजूने एक रिक्षा जात होती.त्या रिक्षातील एकाने दुचाकीवर मागे बसलेल्या व्यक्तीवर गोळ्या झाडल्या.

या घटनेमध्ये दुचाकीवरील व्यक्ती गंभीर जखमी झाला असून त्याला जवळील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर घटनास्थळी रक्ताचे डाग आहेत.तर तीन पुंगळ्या आढळून आल्या आहेत.या घटनेतील आरोपीचा शोध सुरू असून या हल्ल्या मागील अद्याप कारण समजू शकले नसल्याचे सांगण्यात आले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.