Alandi : श्री ज्ञानेश्वर विद्यालयाचे तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत घवघवीत यश

एमपीसी न्यूज – क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र  राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी पुणे, खेड तालुका क्रीडा अधिकारी, खेड तालुका क्रीडा शिक्षक संघटना (Alandi ) यांचे वतीने आयोजित खेड तालुका स्तरीय मैदानी स्पर्धेमध्ये आळंदीतील श्री ज्ञानेश्वर विद्यालयाने घवघवीत यश संपादन केले.

Pimpri : टपरीचालकाचा प्रामाणिकपणा, साडेचार लाखांचे सोने केले परत

14 वर्ष वयोगट मुलामध्ये तुकाराम पिंपळे याने 100 मी. धावणे मध्ये प्रथम क्रमांक मिळवला. तसेच ओमकार जाधव याने 600 मी. धावणेमध्ये द्वितीय क्रमांक मिळवला तर समाधान नागरगोजे 100 मी. धावणे मध्ये तृतीय क्रमांक मिळवला. तसेच 4 ×100 रिलेमध्ये तुकाराम पिंपळे, समाधान नागरगोजे, सुरज सोमवंशी व ऋग्वेद गायकवाड यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.

त्याचबरोबर 17 वर्ष वयोगट मुलामध्ये सुरज वैरागड याने 400 मी. धावणे मध्ये (Alandi ) द्वितीय क्रमांक मिळवला. संतोष झिटे याने 400 मी. धावणे मध्ये तृतीय क्रमांक मिळवला तर समाधान नागरगोजे याने लांब उडी द्वितीय क्रमांक मिळवला. तर 4×100 रिले मध्ये अनिकेत खरात शिवराज बागल अंश सिंग व यश गव्हाणे यांनी तृतीय क्रमांक मिळवला.

19 वर्ष वयोगट मुले यामध्ये विठ्ठल जोगदंड याने 1500 मी. धावणे मध्ये द्वितीय क्रमांक मिळवला. तसेच 4×400 रिले मध्ये नरेंद्र शेळके, विठ्ठल जोगदंड, जय सोविलकर व राहुल रानमारे यांनी द्वितीय क्रमांक मिळवला. तर तुकाराम माने याने 1500 मी. धावणे मध्ये तृतीय क्रमांक मिळवला.

त्याचबरोबर 19 वर्ष वयोगट मुलीमध्ये किरणकुमारी सुधीर महत्तो हिने लांब उडीमध्ये प्रथम व अंजली सुधीर महत्तो हिने लांब उदिमध्ये उडीमध्ये द्वितीय क्रमांक मिळवला तर प्रतिभा भानुदास जुनघरे हिने 100 मी. धावणे मध्ये तृतीय क्रमांक मिळवला.

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व क्रीडा विभाग प्रमुख श्रीरंग पवार,  मार्गदर्शक शिक्षक राजश्री भुजबळ, प्रकाश पवार, येडबा कांबळे यांचे संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगावकर, सचिव अजित वडगावकर, विद्यालयाचे प्राचार्य दिपक मुंगसे, उपप्राचार्य सुर्यकांत मुंगसे, पर्यवेक्षक, शिक्षक यांनी कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा (Alandi ) दिल्या.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.