Vadgaon Maval : श्री कालभैरव जन्माष्टमी महोत्सव संपन्न

एमपीसी न्यूज : मावळ तालुक्याचे श्रद्धास्थान व येथील ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज देवस्थानचे वतीने सात दिवसीय किर्तन सप्ताहाचे आयोजनात करण्यात आले होते. मंगळवार (दि 8)  ह भ प तुषारमहाराज दळवी यांच्या काल्याच्या  किर्तनाने या सोहळ्याची सांगता झाली. दरम्यान पोटोबाचं चांगभलं च्या जय घोषात श्री पोटोबा महाराजांचा जन्मोत्सव  सोहळा मोठ्या आनंदात व उत्साहात संपन्न झाला. 

जन्माष्टमी सप्ताहात देवस्थानच्यावतीने दररोज पहाटे मानक-यांच्या हस्ते अभिषेक, सायंकाळी हरिपाठ, आरती व किर्तनसेवा असे आयोजन करण्यात आले होते. कालाष्टमीच्या दिवशी पहाटे अभिषेक, आरती व रात्री हभप रोहिदास महाराज हांडे यांच्या कीर्तनाने 12:30 वा. श्री पोटोबा महाराज जन्मोत्सव सोहळा झाला.

उत्सव काळामध्ये भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, उद्योजक राजेंद्र म्हाळसकर यांच्यातर्फे मंदिर व परिसरात फुलांची सजावट व आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. भाविक नागेश पगडे यांनी फुलांची आकर्षक रांगोळी काढली होती. देवस्थानचे विश्वस्त सल्लागार अॅड. तुकाराम काटे  यांचे परिवाराचे वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

या संपुर्ण कार्यक्रमाचे नियोजन मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर,सचिव अनंता कुडे, उपाध्यक्ष गणेशआप्पा ढोरे, विश्वस्त किरण भिलारे,चंद्रकांत ढोरे,अरुण चव्हाण, अॅड अशोक ढमाले, अॅड  तुकाराम काटे, तुकाराम उर्फ बुवा ढोरे, सुभाष जाधव, सुनिता कुडे व पुजारी सुरेश गुरव यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.