Pimpri : श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्ट गणेशोत्सव स्पर्धा; आकुर्डीतील श्रीकृष्ण-क्रांती मित्र मंडळ प्रथम

भोसरीतील पठारे लांडगे तालीम मंडळ द्वितीय; पिंपळेगुरवमध्ये गुरूवारी होणार बक्षीस वितरण

एमपीसी न्यूज – पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीने गतवर्षी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेमध्ये आकुर्डी गावठाणातील श्रीकृष्ण-क्रांती मित्र मंडळाने प्रथम क्रमांक पटकाविला. तर, भोसरीतील पठारे लांडगे तालीम व्यायाम मंडळाला द्वितीय तर चिंचवडच्या एस. के. एफ. गणेशोत्सव मंडळाला तृतीय क्रमांक मिळाला आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी आज (सोमवारी) पत्रकार परिषदेत दिली. तसेच येत्या गुरूवारी (दि. 23 )पिंपळेगुरव येथे या स्पर्धेचे बक्षिस वितरण करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

निगडीत झालेल्या पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष सुनिल रासने, चिटणीस माणिक चव्हाण, कोषाध्यक्ष अ‍ॅड. महेश सुर्यवंशी, विश्वस्त दत्तोपंत केदारी आदी उपस्थित होते.

सन 2017 मध्ये घेण्यात आलेल्या या स्पर्धेत पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील 126 सार्वजनिक गणेश मंडळांनी सहभाग घेतला. त्यातील 96 मंडळे बक्षिसांसाठी पात्र ठरली आहेत. ट्रस्टतर्फे 11 लाख 66  हजार रुपयांची बक्षिसे यंदा प्रदान करण्यात येणार आहेत. स्पर्धेत चौथा व पाचवा क्रमांक निगडीच्या जय बजरंग तरूण मंडह व खंडोबा मित्र मंडळाने मिळविला. प्रथम, द्वितीय, तृतीय, चौथा व पाचवा क्रमांक मिळविणा-या या मंडळांना अनुक्रमे पन्नास, पंचेचाळीस, पस्तीस, तीस व पंचवीस हजार रुपये रोख रक्कम आणि ट्रस्टतर्फे चषक प्रदान करण्यात येणार आहे.

ही स्पर्धा प्रभागनिहाय घेण्यात आली. त्यानुसार ‘अ’  प्रभागातून काळभोरनगरचे राष्ट्रतेज तरूण मंडळ, दत्तवाडी-आकुर्डीचे श्री दत्त तरूण मंडळ, रुपीनगरचे दक्षता तरूण मंडळ, आकुर्डीचे नागेश्वर तरूण मंडळ आणि दापोडीचे आझाद मित्र मंडळ,  ‘ब’  प्रभागातून चिंचवडचे अखिल मंडई मित्र मंडळ, वाल्हेकरवाडीचे श्री चिंतामणी मित्र मंडळ, चिंचवडचे उत्कृष्ट तरूण मंडळ, रावेत येथील रावेत प्राधिकरण नागरीक समिती आणि ताथवडेच्या नवजीवन मित्र मंडळ,

‘क’ प्रभागातून भोसरीचे कै. दामुशेठ गव्हाणे मित्र मंडळ, जाधववाडी-चिखली येथील श्री संत सावतामाळी तरूण मंडळ, दिघी रोड-भोसरीतील नवज्योत गणेश मित्र मंडळ, गव्हाणे वस्ती-भोसरीतील जय महाराष्ट्र मित्र मंडळ आणि लोंढे आळी-भोसरी येथील लोंढे तालिम मित्र मंडळ, तर ‘ड’  प्रभागातून पिंपरी वाघेरे येथील अमरदीप तरूण मंडळ, पिंपरीतील डी. वॉर्ड फ्रेंडस सर्कल, पिंपळेगुरव येथील श्री छत्रपती शिवाजी मित्र मंडळ, थेरगाव येथील श्रीमंत छत्रपती शिवाजी तरूण मंडळ आणि सांगवीतील सिझन ग्रुप ऑफ सोशल वेल्फेअर ट्रस्ट यांनी अनुक्रमे एक ते पाच क्रमांक मिळविला. या मंडळांना अनुक्रमे पंचवीस, साडेबावीस, वीस, साडेसतरा आणि पंधरा हजार रुपयांचे रोख बक्षिस दिले जाणार आहे.

या व्यतिरिक्त उपक्रमशिल मंडळ म्हणून वाकडचे नवनाथ तरूण मंडळ, भोसरीचे लांडगे लिंबाची तालीम मंडळ, चिंचवडगावातील गांधी पेठ तालिम मित्र मंडळ, आहेरवाडी-चिखली यथील जय बजरंग मित्र मंडळ आणि भोसरीतील छत्रपती श्री शिवाजी तरूण मित्र मंडळ यांना प्रत्येकी पंधरा हजार रुपये रोख देण्यात येणार आहेत. उत्कृष्ट विद्यूत रोषणाईसाठी जुनी सांगवीतील मधुबन मित्रमंडळ, राही-माई प्रतिष्ठाण शिव मित्र मंडळ, पुनावळेतील अमर तरूण मंडळ, वाकडचे स्वामी विवेकानंद मित्र मंडळ आणि पिंपळे गुरव येथील साई राज मित्र मंडळ यांना, तसेच वैज्ञानिक देखाव्यासाठी आकुर्डीच्या शुभम युवक मित्र मंडळाला प्रत्येकी पाच हजार रुपये बक्षिस देण्यात येणार आहे.

जुनी सांगवीतील जयराज रेसिडन्सी, सार्थक सोसायटी, रावेत येथील भोंडवे एम्पायर, अ‍ॅक्वाब्लू बी हौसिंग सोसायटी आणि रावेत प्राधिकरणातील आदित्य टेरेस हौसिंग सोसायटी यांना उत्कृष्ट सोसायटी म्हणून प्रत्येकी पाच हजार रुपयांचे बक्षिस देवून गौरिवण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे जिवंत देखावा सादर करणा-या पंधरा मंडळांना, तसेच स्थिर हलता देखावा सादर करणा-या वीस मंडळांना  प्रत्येकी दहा हजार रुपये, तर उल्लेखनीय कार्य करणा-या वीस मंडळांना प्रत्येकी पाच हजार रुपये बक्षिस देण्यात येणार आहे. दत्तात्रय भोंडवे, दिलीप माळी, श्रीकांत ताकवले, संतोष ढोरे, प्रफुल्ल तोरसे, संभाजी सुर्यवंशी, संजय कुंभार, रामदास चिंचवडे व वैभव गोडसे यांनी परिक्षण केले.

दरम्यान, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेचे बक्षिस वितरण येत्या गुरूवारी (दि. 23 ) करण्यात येणार आहे. पिंपळेगुरव येथील नटसम्राट निळू फुले रंगमंदिर येथे सायंकाळी सहा वाजता होणा-या समारंभात पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते हे बक्षिस वितरण करण्यात येणार आहे. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या अध्यक्षतेखाली होणा-या कार्यक्रमाला महापौर राहुल जाधव, आयुक्त श्रावण हर्डीकर, उपमहापौर सचिन चिंचवडे, स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड, विरोधी पक्षनेते दत्ता साने,  अतिरिक्त पोलीस आयुक्त मकरंद रानडे आदी उपस्थित राहणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.