Wakad Crime News : गावी घर बांधण्यासाठी पाच लाख आणण्याची मागणी करत विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज – गावी घर बांधण्यासाठी माहेरहून पाच लाख रुपये आणण्याची मागणी करत सासरच्या लोकांनी विवाहितेचा छळ केला. याप्रकरणी तीन महिलांसह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 18 जून 2018 ते 15 जून 2021 या कालावधीमध्ये काळेवाडी येथे घडली.

शामराव सिध्‍दप्‍पा गोडेपाटील (वय 35), रामचंद्र सिद्दप्पा गोडेपाटील (वय 40), सुखदेव सिध्‍दप्‍पा गोडेपाटील (वय 32) आणि तीन महिला (सर्व रा. काळेवाडी पोलीस चौकीच्या पाठीमागे काळेवाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी 28 वर्षीय विवाहितेने रविवारी (दि. 12) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी आपसात संगनमत करून गावी घर बांधण्यासाठी माहेरहून पाच लाख रुपये आणण्याची मागणी केली. त्यावरून तिला शिवीगाळ व मारहाण केली. तसेच घरातून हाकलून दिले. आरोपी शामराव गोडेपाटील यांनी फिर्यादी यांच्या चारित्र्यावर संशय घेऊन त्यांना प्रचंड मानसिक व शारीरिक त्रास दिला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस याप्रकरणी तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.