Pimpri: ‘स्मार्ट सिटी’च्या संचालक मंडळाची शनिवारी बैठक; लेखापाल राजेश लांडे यांची स्मार्ट सिटीत लागणार वर्णी

एमपीसी न्यूज  – पिंपरी-चिंचवड ‘स्मार्ट सिटी’ लिमिटेडच्या संचालक मंडळाची बैठक येत्या शनिवारी (दि.17) होणार आहे. या बैठकीत ‘स्मार्ट सिटी’च्या विविध विषयांवर चर्चा होणार आहे. यासह विविध कामे मार्गी लावण्यासाठी प्रोजेक्‍ट मॅनेजमेंट युनिटला मान्यता देण्यात येणार आहे. 

पिंपरी-चिंचवड महापालिका भवनात शनिवारी सकाळी दहा वाजता बैठक होणार आहे. ‘स्मार्ट सिटी’चे अध्यक्ष नितीन करीर अध्यक्षस्थानी असणार आहेत. या बैठकीत पीएमपीएमएलचे संचालक तुकाराम मुंडे यांचा संचालक पदाचा राजीनामा स्वीकारला जाणार आहे. मुख्य वित्तीय अधिकारी म्हणून राजेश लांडे यांनी नियुक्‍ती करण्यात येणार आहे. 

स्मार्ट सिटी योजनेच्या विविध कामांच्या निविदा प्रक्रिया राबविली आहेत. त्या निविदा प्रक्रियेची कामेही तत्काळ सुरु करण्यात येणार आहेत. तसेच स्मार्ट सिटी कंपनीच्या सचिवपदी नागपूरचे अधिकारी पराग धासरवार यांची नियुक्त करण्यात आली आहे. ही नियुक्ती एका वर्षासाठी असून त्यांना प्रतिमहा 25 हजार रुपये मानधन दिले जाणार आहे. त्यांनी यापुर्वी नागपूर मेट्रो व नागपूर महापालिकेचा त्यांना अनुभव आहे. त्यांना कालावधीची मुदत संपल्यानंतर हे पद निविदा काढून भरण्यात आले आहे. 

या स्मार्ट सिटी संचालक मंडळाच्या बैठकीत विविध विषयावर चर्चा करुन प्रोजेक्‍ट मॅनेजमेंट युनिट नेमणुकीस मान्यता देणे, स्मार्ट सिटीच्या अर्थसंकल्पाचा नमुना निश्‍चित करणे, महापालिकेचे मुख्य लेखापाल राजेश लांडे यांची मुख्य वित्तीय अधिकारी म्हणून नेमणूक करणे, कंपनी कायद्यानुसार जीएसटी व सर्व्हिस टॅक्‍सची आकारणी करणे, यासह आदी विषयावर चर्चा होणार आहे. तसेच पीएमपीएमएलचे तत्कालीन अध्यक्ष तुकाराम मुंढे यांच्या जागी नयना गुंडे यांची नियुक्ती केल्याने त्यांना संचालक म्हणून मान्यता देण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.