Pune : ….. म्हणून पंतप्रधानांच्या कार्यक्रमाला गेलो नाही- संजय काकडे

एमपीसी न्यूज- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुण्यातील कार्यक्रमाला मला निमंत्रण देण्यात आले नाही. म्हणून मी कार्यक्रमाला गेलो नाही, अशी भूमिका खासदार संजय काकडे यांनी मांडली. ते आज पुण्यात वाडेश्वर कट्टयावर बोलत होते.

“मी भाजपकडून पुण्याची जागा लढणार आहे. माझ मेरिट पाहता पक्ष मला संधी देईल आणि मी आतापर्यंत दीड लाख सभासद केले आहे” जनतेमधून संसदेत जाणार असल्याचे ते म्हणाले.
पुण्यात वाडेश्वर कट्टयावर ‘पुण्याचा भावी खासदार कोण ?’ या विषयावर चर्चा रंगली होती. यावेळी अंकुश काकडे, मोहन जोशी, बाबू वागसकर उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.