Talegaon Dabhade : सामाजिक कार्यकर्त्या सरस्वती पवार यांचे निधन

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सरस्वती एकनाथ पवार (वय ८०वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने गुरुवारी दुपारी निधन झाले. त्या धार्मिक वृत्तीच्या होत्या.

त्यांच्यामागे पती, दोन मुले, सूना, पुतणे, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. माजी नगरसेवक अरुण एकनाथ पवार व डोळसनाथ उत्सव समितीचे माजी अध्यक्ष अनिल एकनाथ पवार यांच्या त्या मातोश्री होत.

त्यांचा अंत्यविधी बनेश्वर स्मशानभूमी येथे होईल. अंत्ययात्रा राहत्या घरापासून (मुरलीधर मंडळ, खळदे आळी तळेगाव दाभाडे) सायंकाळी ७:३० वा. निघेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.