Talegaon Dabhade : तळेगावमध्ये एरोमॉडेलिंग शोचे आयोजन 

एमपीसी न्यूज – विश्वकल्याण एज्युकेशन सोसायटी अंतर्गत (Talegaon Dabhade) जैन इंग्लिश स्कुलच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त विद्यार्थ्यांना व पालकांना विमानातील विज्ञान व विमान छंद एरोमॉडेलिंगचा परिचय देण्यासाठी या नाविन्यपूर्ण शोचे आयोजन करण्यात आले आहे. हा शो मंगळवारी (दि. 20) सकाळी साडेसात वाजता थोर समाजसेवक नथूभाऊ भेगडे पाटील शाळेच्या मैदानावर होणार आहे. अशी   माहिती विश्वकल्याण एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष व जैन इंग्लिश स्कूलचे चेअरमन प्रकाश ओसवाल यांनी एमपीसी न्यूजच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली. 

Pune : पिंपरी चिंचवड मधील सहायक आयुक्तांच्या सांगण्यावरून लाच घेतल्याबद्दल एकास अटक

तळेगाव नगरपरिषदेच्या थोर समाजसेवक नथुभाऊ भेगडे पाटील शाळेच्या मैदानावर मंगळवार (दि 20) सकाळी 7:30 वाजता आम्ही एका एरोमॉडेलिंग शो चे आयोजन करत आहोत. विश्वकल्याण एज्युकेशन सोसायटी अंतर्गत जैन इंग्लिश स्कुलच्या रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना व पालकांना विमानातील विज्ञान व विमान छंद एरोमॉडेलिंगचा परिचय देण्यासाठी या नाविन्यपूर्ण शो चे आयोजन आम्ही करत आहोत.

हा शो तळेगावातील भव्य पध्दतीने होणारा पहिला एरोमॉडेलिंग शो आहे. या शो मध्ये रेडिओ कंट्रोलने नियंत्रित करता येणाऱ्या इलेक्ट्रिक मोटारवर उडणाऱ्या मॉडेल विमानांची प्रात्यक्षिके दाखवली जाणार आहेत.

या विषयातील तज्ञ व अनुभवी एरोमॉडेलर हा कार्यक्रम सादर करणार आहेत. या कार्यक्रमात सादर केली जाणारी रेडीओ कंट्रोल विमानांची आकर्षक प्रात्याक्षिके उडता पक्षी, मासा,उडती तबकडी, ट्रेनर, एरोबेटिक बंनर हवाई पुष्पवृष्टी पाहायला मिळेल.

शिवाय थरारक कसरती भारतीय वायु सेनेतील राफेल, मिराज तेजस व सुखोई-30 यांचे माॅडेल सुद्धा पाहायला मिळेल. त्यासाठी सर्वांनी या शो ला उपस्थित रहावे अशी विनंती शाळेचे चेअरमन प्रकाश ओसवाल यांनी केली (Talegaon Dabhade) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.