Talegaon Dabhade : अहो ऐकलं का! तळेगावच्या फ्लफीमध्ये मिळताहेत चिकन, मटण मेरीनेडचे तब्बल दहा प्रकार  

नॉनव्हेजचा आवडेल तो प्रकार घरी नेऊन फक्त शिजवायचा अन ताव मारायचा

एमपीसी न्यूज – हॉटेलमध्ये ऑर्डर दिली की पाहिजे त्या प्रकारची नॉनव्हेज डिश (Talegaon Dabhade) मिळते. पण त्यात पैसे खूप जातात.शिवाय प्रत्येक ठिकाणी स्वच्छता राखली जातेच असे नाही. मग याला पर्याय काय? असा जर विचार करत असाल तर तुमच्यासाठी अतिशय आनंदाची पर्वणी आहे. तळेगाव मध्ये फ्लफीचे महाराष्ट्रातील पहिले सुपर स्टोअर सुरु झाले आहे. इथे चिकन आणि मटणाचे तब्बल 10 प्रकारचे मेरीनेट मिळतात. रेडी टू इट असलेले हे पाहिजे त्या चवीचे मेरीनेट घरी मागवायचे अन फक्त शिजवून वाढून घ्यायचे, एवढंच काम करावं लागणार आहे. यात हॉटेलला जाण्याचा वेळ, पैसा तर वाचेलच शिवाय स्वच्छताही बाळगली जाईल.

 

भगत चेंबर, शर्मा बेकरी जवळ, तळेगाव स्टेशन येथे प्रसिद्ध अभिनेत्री पूजा सावंत हिच्या हस्ते रविवारी फ्लफीच्या महाराष्ट्रातील पहिल्या सुपर स्टोअरचे उद्घाटन झाले आहे. त्यामुळे फ्लफीचे फ्रेश चिकन, मटण अन मासे आता तळेगाव मध्ये मिळणार आहेत. स्टोअरमध्ये येऊन पाहिजे ते मिष्टान्न हव्या त्या चवीचे खरेदी करता येईलच शिवाय घरी बसूनही मागवता येईल. इथे राखली जाणारी स्वच्छता आणि चिकन, मटण आणि माशांचा फ्रेशपणा इतर कुठेही अनुभवता येणार नाही, याची खात्री दिली जात आहे.Pune : ओशो आश्रमाची जागा बजाज यांना विकण्यास मनाई
उद्घाटन समारंभासाठी माजी मंत्री संजय तथा बाळा भेगडे,उद्योजक रामदास काकडे,संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे,सत्यशील राजे दाभाडे सरकार, API देहूरोड पोलीस स्टेशन हर्षल कामराज, प्रदेशाध्यक्ष संभाजी ब्रिगेड प्रवीण गायकवाड, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश खांडगे, महाराष्ट्र प्रदेश किसान मोर्चा अध्यक्ष गणेश भेगडे,

तालुका राष्ट्रवादीचे वरिष्ठ उपाध्यक्ष गणेश काकडे,सरसेनापती उमाबाई दाभाडे नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष बजरंग जाधव, पुणे जिल्हा भाजपा उपाध्यक्ष अशोक काळोखे,मा नगराध्यक्ष सुरेश चौधरी, सुरेश धोत्रे,ॲड रवींद्र दाभाडे, बाळासाहेब काकडे,मा नगरसेवक किशोर भेगडे,सुदर्शन खांडगे,सतिश काळे,चंद्रकांत काकडे,हरिश्चंद्र गडसिंग,अशोक भेगडे,विलास काळोखे,संग्राम काकडे,राज खांडभोर आदी मान्यवर उपस्थित होते.

संस्कृती जपणारं आपलं पुणे खाद्य संस्कृतीत पण काही मागे नाही..! पुणे आता खवय्यांचे त्यातल्या त्यात नॉनव्हेज प्रेमींचं हक्काचं माहेरघर होत आहे. पण यात तुम्हाला पुरवले जाणारे मासे, चिकन व मटण यांच्या गुणवत्तेबाबत तुम्ही विचार केलाय का? जर तसा विचार करत असाल तरच तुम्ही चोखंदळ खाद्यप्रेमी आहात. तुमची हीच गरज आता फ्लफी पूर्ण करणार आहे. तळेगाव दाभाडे येथे पुण्यातले सगळ्यात पहिले गुणवत्तापूर्ण चिकन, मटण व मासे पुरवणारे आउटलेट सुरू झाले आहे.

दक्षिण भारतातील ही संकल्पना पुण्यामध्ये प्रथम तळेगाव दाभाडे येथे आली आहे. हायजेनिक, शुद्ध, ताजे चिकन, मटण, मासे तसेच रेडी टू ईट मरीनेडचे विविध प्रकार,उत्तम क्वालिटी,गुणवत्तापूर्ण सेवा, होम डिलीव्हरीची सोय असलेल्या फ्लफीला भेट द्या आणि आपली दर्जेदार आणि चविष्ट मांसाहाराची भूक भागवा.

या प्रसंगी रामदास काकडे,बापूसाहेब भेगडे,गणेश भेगडे,प्रवीण गायकवाड, संजय बाळा भेगडे,अभिनेत्री पूजा सावंत आदींनी मनोगत व्यक्त करत फ्लफीचे संचालक विक्रम काकडे, तुषार थोपटे व अनुराग जाधव या त्रयींनी नवोदित व्यवसायात पदार्पण केल्याबद्दल त्यांचे कौतुक करून त्यांच्या नूतन व्यवसायाला शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत फ्लफीचे संचालक तुषार थोपटे व अनुराग जाधव यांनी केले तर सूत्रसंचालन मीनाक्षी बालकमल   यांनी केले. फ्लफीचे संचालक विक्रम काकडे यांनी आभार (Talegaon Dabhade)  मानले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.