Talegaon Dabhade News : सामाजिक कार्यकर्ते सुनील नारायण गायकवाड यांचे अल्पशा आजाराने निधन

एमपीसी न्यूज : तळेगाव दाभाडे येथील सामाजिक कार्यकर्ते, सहकार भारती मावळ तालुका अध्यक्ष, तळेगाव नागरी सहकारी पतसंस्थेचे माजी चेअरमन व सह्याद्री इंग्लिश स्कूलचे ज्येष्ठ संचालक सुनील नारायण गायकवाड (वय ५५) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, विवाहित मुलगी, दोन भाऊ असा परिवार आहे. सहकार, कला, क्रीडा, सामाजिक, शैक्षणिक  व सांस्कृतिक क्षेत्रात विशेष सहभाग घेऊन समाजासाठी झटणारा कार्यकर्ता हरपल्याची भावना लोकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.