Solapur: बहिणीच्या लग्नात मनासारखे कपडे न घेतल्याने तरुणाची आत्महत्या

Solapur: A young man commits suicide by not taken good clothes at his sister's wedding रागाच्या भरात त्याने शेतात झाडाला नॉयलान दोरीने गळफास घेतला.

एमपीसी न्यूज- बहिणीच्या लग्नात मनासारखे कपडे घेतले नसल्याचा राग मनात धरून तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यात घडली.

नीलेश दत्तात्रय हेंबाडे (वय १९, रा. हेंबाडे वस्ती, डोंगरगाव, ता. मंगळवेढा) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना मंगळवारी उघडकीस आली.

सोमवारी (दि.15) नीलेशच्या बहिणीचे मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लग्न झाले. लग्नात आपल्याला मनासारखे कपडे घेतले नसल्याचा नीलेशच्या मनात राग होता. रागाच्या भरात त्याने शेतात झाडाला नॉयलान दोरीने गळफास घेतला.

मंगळवारी सकाळी त्याने गळफास घेतल्याचे कुटुंबीयांना दिसून आले. आई, वडील, आजोबा यांनी त्याला मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

नीलेश हा सांगोला तालुक्यातील कडलास येथे दूध डेअरी डिप्लोमाचे प्रशिक्षण घेत होता. परंतु, लॉकडाऊनमुळे हे प्रशिक्षण केंद्र बंद झाल्यामुळे तो घरीच आला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.