Pimpri: कोरोना बळींची संख्या वाढतेय; मृत्यूमध्ये वयोवृद्धांचे प्रमाण जास्त

Pimpri: Corona victims on the rise; The proportion of elderly people in death is high कोरोनाने शहरातील आणि शहराबाहेरील अशा एकूण 44 जणांचा आजपर्यंत बळी घेतला आहे.

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड शहरात आता कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या वाढत आहे. मागील काही दिवसात शहरातील रुग्णांची बळींची संख्या 24 वर जाऊन पोहचली आहे. तर, पालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचार घेणाऱ्या हद्दीबाहेरील 20 जणांचा आजपर्यंत मृत्यू झाला आहे.

कोरोनासह विविध आजार असल्याने मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये वयोवृद्धांचे प्रमाण जास्त आहे. कोरोनाने शहरातील आणि शहराबाहेरील अशा एकूण 44 जणांचा आजपर्यंत बळी घेतला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात 10 मार्च रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. मागील काही दिवसांपासून रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. आजपर्यंत शहरातील 1361 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

बाधितांमध्ये युवकांचे प्रमाण सर्वाधिक आहे. 810 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर, 527 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. शहरातील कोरोनाचा पहिला बळी 12 एप्रिल रोजी गेला होता.

थेरगाव भागातील एका पुरुषाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आजपर्यंत शहरातील 24 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

शहरातील कोरोनाच्या एकूण रुग्ण संख्येच्या तुलनेत मृत्यूचा आकडा अवघा दीड ते पावणेदोन टक्के असला. तरी, चिंताजनक आहे. मृतांमध्ये वयोवृद्ध आणि कोरोनासह विविध आजार असलेल्यांचे प्रमाण जास्त आहे.

मृत्यू झालेले अनेक रुग्ण संसर्ग झाल्यानंतर उशिरा उपचारासाठी दाखल झाले होते. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर काहींचा मृत्यू, तीन चार दिवसांत, काहींचा मृत्यू अवघ्या काही तासांत झाला आहे.

विविध आजार असलेल्यांनी काळजी घ्यावी
विविध आजार असलेल्यांनी अधिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर पूर्वीचे आजार डोकेवर काढतात. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांची विशेष काळजी घेण्याचे आवाहन महापालिकेकडून केले जात आहे.

आजपर्यंत साठच्या आतील फक्त चार जणांचा मृत्यू झाला आहे. त्यांनाही अन्य विकार होते. तसेच ते रुग्णालयात दाखल झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.