Pune : पुणे शहराच्या आसपासच्या पर्यटनस्थळासाठी 1 मे पासून विशेष बससेवा

एमपीसी न्यूज – पुण्याच्या आसपासच्या पर्यटन स्थळांना चालना मिळावी, (Pune) नागरिकांना कमी खर्चात फिरता यावे यासाठी 1 मे पासून पीएमपीएमएलकडून विशेष बससेवा सुरु कऱण्यात आली आहे. प्रत्येक आठवड्याच्या शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी पर्यटन सुरू राहणार आहे. या विशेष सेवेसाठी वातानुकुलित ईलेक्ट्रीक बस देखील पुरवल्या जाणार आहेत.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री खंडोबा जेजूरी व अष्टविनायक पैकी मयुरेश्वर मोरगांव, चिंतामणी थेऊर, महागणपती रांजणगांव तसेच पुणे, पिंपरी चिंचवड शहर व लगतच्या पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रातील विविध धार्मिक स्थळे, तीर्थस्थळांचे दर्शन घेण्याकरिता व पर्यटन स्थळास भेट देण्याकरिता मोठ्या प्रमाणात, भाविक व पर्यटक येत असतात.

Pune : आधुनिक महाराष्ट्र घडविण्यासाठी एकजुटीने कार्य करावे – दीपक केसरकर

प्रत्येक आठवड्याच्या शनिवारी व रविवारी विविध कार्यालये, कॉलेज, शाळा, औद्योगिक क्षेत्रातील व आयटी क्षेत्रातील कंपन्यांमधील नोकरदारांना साप्ताहिक सुट्टी असल्याने प्रवाशांचा प्रतिसाद जास्त असतो. या प्रवाशांचा प्रवास आरामदायी, सुलभ व माफक दरात होणेच्या दृष्टीने पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (Pune) पुणे दर्शन बससेवेच्या धर्तीवर व 16 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून धार्मिक व पर्यटन स्थळांकरिता वातानुकूलीत ई-बसेसव्दारे विशेष बससेवा सुरु केली आहे.

 

पर्यटन बससेवेचे मार्ग व इतर माहिती खालीलप्रमाणे

 

1)     पर्यटन बससेवा क्र. –

Ø मार्ग – हडपसर, मोरगांव, जेजूरी, सासवड, हडपसर.

Ø बस सुटण्याची वेळ – सकाळी 9

Ø बस पोहोचण्याची वेळ – दुपारी चार

Ø बसचा पहिला व शेवटचा थांबा – हडपसर गाडीतळ

Ø प्रति प्रवासी तिकीट दर – 1 हजार रुपये

 

2)     पर्यटन बससेवा क्र.

Ø मार्ग – हडपसर, सासवड सोपानकाका मंदिर, संगमेश्वर मंदिर, नारायणपूर, बालाजी मंदिर (केतकवळे), बनेश्वर

मंदिर, कोंढणपूर मंदिर, हडपसर.

Ø बस सुटण्याची वेळ – सकाळी 9

Ø बस पोहोचण्याची वेळ – सांयकाली साडे सहा

Ø बसचा पहिला व शेवटचा थांबा – हडपसर गाडीतळ

Ø प्रति प्रवासी तिकीट दर – 1 हजार रुपये

 

3) पर्यटन बससेवा क्र.

Ø मार्ग – डेक्कन, खारावडे म्हसोबा देवस्थान, टेमघर धरण, निळकंठेश्वर पायथा, डेक्कन.

Ø बस सुटण्याची वेळ – सकाळी 9

Ø बस पोहोचण्याची वेळ – सायंकाळी पाच

Ø बसचा पहिला व शेवटचा थांबा – डेक्कन जिमखाना

Ø प्रति प्रवासी तिकीट दर – 1 हजार रुपये

 

4)    पर्यटन बससेवा क्र.

Ø मार्ग – पुणे स्टेशन, खडकवासला धरण, पानशेत धरण, वरसगांव धरण, पुणे स्टेशन.

Ø बस सुटण्याची वेळ –  सकाळी 9

Ø बस पोहोचण्याची वेळ – सायंकाळी पावणे पाच

Ø बसचा पहिला व शेवटचा थांबा – पुणे स्टेशन बसस्थानक

Ø प्रति प्रवासी तिकीट दर – 1 हजार

 

5) पर्यटन बससेवा क्र.

Ø मार्ग – पुणे स्टेशन, पुलगेट, हडपसर, रामदरा, थेऊर गणपती, प्रयागधाम, हडपसर, पुणे स्टेशन.

Ø बस सुटण्याची वेळ – सकाळी 9

Ø बस पोहोचण्याची वेळ – सायंकाळी साडे पाच

Ø बसचा पहिला व शेवटचा थांबा – पुणे स्टेशन बसस्थानक

Ø प्रति प्रवासी तिकीट दर –  700 रूपये

 

6)  पर्यटन बससेवा क्र.

Ø मार्ग – पुणे स्टेशन, वाघेश्वर मंदिर (वाघोली), वाडेबोल्हाई, छ. संभाजी महाराज समाधीमंदिर (वढू बुद्रुक),

रांजणगांव गणपती, पुणे स्टेशन.

Ø बस सुटण्याची वेळ – सकाळी 9

Ø बस पोहोचण्याची वेळ – साडे पाच

Ø बसचा पहिला व शेवटचा थांबा – पुणे स्टेशन बसस्थानक

Ø प्रति प्रवासी तिकीट दर –  1 हजार रूपये

 

7)  पर्यटन बससेवा क्र.

Ø मार्ग – भक्ती शक्ती निगडी, अप्पूघर, इस्कॉन मंदिर (रावेत), मोरया गोसावी मंदिर (चिंचवड), प्रतिशिर्डी

(शिरगांव), देहूगांव, गाथा मंदिर, आळंदी, भक्ती शक्तीनिगडी.

Ø बस सुटण्याची वेळ – सकाळी 9

Ø बस पोहोचण्याची वेळ – सायंकाळी 6 वाजून 20 मिनीट

Ø बसचा पहिला व शेवटचा थांबा – निगडी भक्ती शक्ती बसस्थानक

Ø प्रति प्रवासी तिकीट दर – 700 रुपये

 

 

पीएमपीएमएल पर्यटन बससेवेबाबत इतर माहिती खालीलप्रमाणे

  • बसेसच्या आसन क्षमतेनुसार पूर्ण 33 प्रवाशांचे ग्रुप तिकीट काढल्यास 5 प्रवाशांच्या तिकीट दरामध्ये 100 टक्के सवलत देण्यात येईल .

 

  • परिवहन महामंडळाचे 1) डेक्कन जिमखाना,2) पुणे स्टेशन, 3) स्वारगेट,4) कात्रज, 5) हडपसर गाडीतळ, 6) भोसरी बसस्थानक, 7) निगडी, 8) मनपा भवन या पास केंद्रावर सदरील बससेवेचे तिकिट बुकींग करण्यात येईल.

 

  • सदरील बससेवेस ज्या दिवशी प्रवाशांचा अल्प प्रतिसाद लाभेल तसेच काही अपरिहार्य कारणास्तव सदरची बससेवा रद्द झाल्यास त्या प्रवाशांना इतर दिवशी (त्यापुढील आठवड्याच्या शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टी) प्रवास करण्याची मुभा राहील.

 

  • सदरील बससेवेचे ज्या दिवशी बुकींग केले असेल त्या दिवशी सदर प्रवासास राहत्या घरापासून बस सुटण्याच्या ठिकाणापर्यंत व सायंकाळी पोहचल्यानंतर त्यांना त्यांच्या राहत्या घरापर्यंत सदरील तिकिटावर अन्य मार्गाच्या बसेसमधून प्रवास करण्याची मुभा राहील.

 

  • प्रवाशांना मार्गदर्शन करण्याकरिता प्रत्येक बसमध्ये गाईड सेवकाची नेमणूक करण्यात येणार आहे.

 

वॉटर पार्कसाठीही विशेष बससेवा –

प्रत्येक आठवडयाच्या शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सिंहगड रोडवरील कृष्णाई वॉटर पार्क व लोणावळा रोडवरील इमेजिका वॉटर पार्क येथे जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीकरीता परिवहन महामंडळामार्फत प्रासंगिक करारावर बसेस देण्यात येणार आहेत. सदरच्या बुकिंग करीता 020 24503300 या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे.

तरी पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून सुरू करण्यात येत असलेल्या पर्यटन बससेवेचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन परिवहन महामंडळाकडून करण्यात आले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.